“कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती” – नरेंद्र मोदी

Featured महाराष्ट्र
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क):  कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. महाराष्ट्रात ही चिंता जरा जास्त आहे. महाराष्ट्राच्या नागरिकांना प्रार्थना आहे की मास्क वापरा, सारखे हात धुणे कायम ठेवा, दोन मीटर अंतर कायम राखा. जोपर्यंत औषध नाही तोवर ढिलाई नको, अशा शब्दांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांचा हा सुचक इशारा असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. दरम्यान आपण ही लढाई जरूर जिंकणार आहोत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

– भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी पध्दतीने झाले. त्यावेळ ते बोलत होते. प्रकाशनाला सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन, त्या संस्थेला ‘लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’असे नामकरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

– दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबद्दलच्या परिस्थितीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली चिंता हा गंभीर मुद्दा समजला जातो. आगामी काळात परिस्थिती आटोक्यात आली नाहीच तर केंद्र सरकार त्याबाबत हस्तक्षेप करू शकते अशीही चर्चा आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *