
चिंताजनक ! धुळे शहरातील मृत व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह
चिंताजनक ! धुळे शहरातील मृत व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): शहरात आतापर्यंत एकही करोनाबाधित रूग्ण आढळून आला नव्हता. मात्र काल (दि.२०) तिरंगा चौकातील एकाला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य यंत्रणा व महापालिकेने ३ किमी परिक्षेत्र सील केले होते. मात्र आज धुळे शहरातील एक मृत झालेल्या प्रौढाचा करोना अहवाल मंगळवारी दुपारी पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
धुळे शहरातील मच्छीबाजारमधील हा प्रौढ असल्याचे समजते. आरोग्य यंत्रणेने येथील परिक्षेत्र सील करण्याचे काम सुरू केले असून त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. या मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान धुळे जिल्हा दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे.