न्यूझीलंडमध्ये कोरोनाची पुन्हा घुसखोरी- पंतप्रधानांनी वाढवला लॉकडाऊन

Featured इतर
Share This:

न्यूझीलंडमध्ये कोरोनाची पुन्हा घुसखोरी- पंतप्रधानांनी वाढवला लॉकडाऊन

 

ऑकलंड (तेज समाचार डेस्क): न्यूझीलंड १०० दिवसात कोरोनामुक्त झाला होता. आता पुन्हा एकदा कोरोनाने न्यूझीलंड मध्ये घुसखोरी केली आहे. न्यूझीलंडमधील सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 69 झाली आहे. तर मागच्या 24 तासात न्यूझीलंडमध्ये 13 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आणि हि गंभीर बाब आहे. कारण कि, न्यूझीलंड जून महिन्यातच कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली गेली होती. तसंच 100 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. पण, आता पुन्हा एकदा कोरोनाने देशात आपलं जाळं पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे याचा परिणाम न्यूझीलंड मधील निवडणुकांवर झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढल्याने सर्वसाधारण निवडणुका चार आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. “सर्व नवे कोरोनाबाधित हे ऑकलंडमधील एक क्लस्टरशी संबंधित आहेत. यामधील एक मुलगा या महिन्याच्या सुरुवातील अफगाणिस्ताहून न्यूझीलंडमध्ये होता. सुरुवातीला तो कोरोना निगेटिव्ह होता. परंतु, क्वॉरन्टाईन पीरियडच्या दरम्यान तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. तेव्हापासून तो ऑकलंडमध्ये क्वॉरन्टाईन आहे. तर इतर 12 कोरोनाबाधित कम्यूनिटीमधील होते.” अशी माहिती, आरोग्यविषयक महासंचालक अॅशले ब्लूमफील्ड यांनी दिली. नव्या कोरोनाबाधितांसह न्यूझीलंडमधील रुग्णांची संख्या आता जवळजवळ 1271 झाली आहे. त्यामध्ये 69 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड च्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी शुक्रवारी (14 ऑगस्ट) ऑकलंड क्षेत्रात अलर्ट 3 लॉकडाऊन आणि इतर ठिकाणी अलर्ट 2 लॉकडाऊन घोषित करुन 26 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. हा लोकडोवन १२ दिवसांचा असनार आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *