शिरपूर तालुक्यातील आढळला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण

Featured धुळे
Share This:
शिरपूर (तेज समाचार डेस्क): शिरपूर तालुक्यात देखील कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला असुन तालुक्यातील आमोदे गाव रात्री २ वाजेच्या सुमारास सिल करण्यात आले आहे.रात्रीच्या सुमारास माहिती प्राप्त झाल्यानंतर गाव सिल करण्यात आले. या नंतर तातडीने खलील निर्णय घेण्यात आला आहे.
शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्र, आमोदे, शिंगावे, मांडळ या गावांमधील  सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, शिरपूर शहर परिसरात कोरोनाचा रूग्ण आढळला असल्याने  संपूर्ण शिरपूर शहर, आमोदें, शिंगावे, मांडळ या गावांमध्ये दि. 23 एप्रिल 2020 ते दि. 25 एप्रिल 2020 या तीन दिवसांच्या काळात लाॅकडाऊन  करण्यात येत आहे.
याकाळात शहरातील हाॅस्पिटल व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहतील.
लाॅकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कलम 188 नुसार कडक कारवाई करण्यात येईल. असे आदेश मा . प्रांताधिकारी डाॅ. बांदल यांनी दिले आहेत.
आमोदे येथील ४५ वर्षीय महिला गेल्या आठवड्यातच मुंबईहून गावी आली होती. २२ एप्रिल रोजी त्या महिलेला खोकला, तसेच श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने, तिला प्राथमिक रूग्णालयात दाखल करून तिचे स्वॅब धुळे येथे पाठविण्यात आले. तिच्यात कोरोनाचे लक्षणे आढळल्याने तिला धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याचे समजताच रात्री प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंग बादल, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी अमोल बागूल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुळकर्णी आदींची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आमोदे गाव सील करण्यात आले.
दरम्यान सुरक्षिततेचे उपाय म्हणून शिरपूर-वरवाडे नगरपरिषद क्षेत्र, आमोदे, शिंगावे, मांडळ या गावांमध्ये २३ ते २५ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *