
शिरपूर ब्रेकिंग : भूपेश नगरात आढळला एक अजून कोरोना रुग्ण
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि). शिरपूर तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव शिरपूर ग्रामीण पर्यंतच होता, परंतु आता कोरोना शिरपूर शहरात ही दाखल झाला आहे. शहरातील भूपेश नगर मध्ये एका 52 वर्षीय व्यक्तिची कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आली आहे.
– 22 मे पर्यंत सर्व व्यवहार बंद
प्रांताधिकारी डाॅ. विक्रम बांदल यानी नागरिकांसाठी एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार शिरपूर शहरात कोरोनाचा एक रूग्ण आढळला असल्याने संपूर्ण शिरपूर शहरात 20 मे 2020 ते 22 मे 2020 या तीन दिवसांच्या काळात संपूर्ण शहर कंटेन्टेमेंट जोझ असणार आहे व शहरातील सर्व व्यवहार बंद असणार आहे. या ती दिवसात फक्त हाॅस्पिटल व औषधांच्या दुकानांनाच मुभा दिल्या गेली आहे. या नंतर 23 मे ते 2 जून दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहतील. लाॅकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा आणि कलम 188 नुसार कडक कारवाई करण्यात येईल.