
सावधान, 32 जणांचा बळी घेत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 600च्या पार
मुंबई (तेज समाचार डेस्क). संपूर्ण देशात जितक्या वेगाने महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, ती अत्यंत चिंतेची बाब आहे. राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या 635 वर गेली आहे. आतापर्यंत 32 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. असे असून ही आता पर्यंत कोरोनाची लागण झालेले 52 रुग्ण बरे पण झाले आहे.
महाराष्ट्रात मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या तब्बल 330 इतकी झाली आहे. एकट्या मुंबईतच करोना ने 22 जणांचा बळी घेतला आहे.
महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबई हा या साथीचा केंद्रबिंदू ठरला आहे. मुंबईत आज करोनाचे नवीन 52 रुग्ण आढळले आहेत तर आज चार जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. आज ज्या चार जणांचा मृत्यू झाला आहे त्यात एक व्यक्ती वृद्ध होती तर अन्य तिघांना विविध शारीरिक व्याधींनी ग्रासलेले होते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.