शिरपूर : कोरोनाबाबतचा आदेशाचे उल्लंघन- गुन्हा दाखल

Featured धुळे
Share This:

शिरपूर (तेज़ समाचार प्रतिनिधि ): कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असतांना व गर्दी टाळण्यासाठी ३१ मार्च पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता बाकीच्या सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिऱ्यांनी यांनी दिले असतांना शिरपूर शहरात या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गर्दी टाळावी असा उद्देश असल्याने अभ्यासिका,लग्न व अन्य समारंभाची सभागृहे, शैक्षणिक संस्था व रहिवास वस्ती मधील मैदाने,लॉन्स, हॉटेल,मॅरेज हॉल,कम्युनिटी सेन्टर,पानपट्टी,कॉफी,ज्युस हाऊस, सर्व हॉटेल्स,परमिट रूम, बिअर बार, उद्याने, संग्रहालये आदी ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरण यांनी पारित केले आहेत.हे आदेश ,गर्दी गोळा होऊ नये व कोरोनाचा प्रसार होऊ नये या उद्देशाने पारित केले असतांना व त्या आदेशाचे पालन करण्यासाठी शिरपूर शहरात प्रशासनाचे अधिकारी प्रयत्नशील असतांना शहरातील दि.२१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास करवंद नाका परिसरात संत सावंत पान सेंटर सुरू असल्याचे व मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवून पान टपरी चालक दिलीप भगवान माळी रा.हुलेसिंग नगर करवंद नाका हे व्यवहार करतांना व शहरात विना नावाची टपरी सदृश्य हातगाडीवर लोकांनी गर्दी करून चहाची विक्री करताना सतीश दगा माळी हे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,स्वप्नील बांगर,अमित रनमाळे,नरेंद्र शिंदे, प्रवीण गोसावी व वाहन चालक हरून शेख हे शहरात ११:३० ते १२:०० वाजेच्या दरम्यान पेट्रोलिंग आढळून आले. याप्रकरणी पोकॉ नरेंद्र शिंदे व पोकॉ शरद ठाकरे यांच्या वेगवेगळ्या फिर्यादी वरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पानटपरी चालक दिलीप भगवान माळी रा.हुलेसिंग नगर करवंद नाका व सतीश दगा माळी वय ३७ महात्मा फुले चौक वरवाडे यांच्या विरोधात व्यक्ती,संस्था,अथवा संघटना महाराष्ट्र (Covid-१९) उपाययोजना २०२० च्या कलम ११ नुसार व भादंवी १९६० चे कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *