“देशात कोरोनामुळे 1 ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता”

Featured मुंबई
Share This:

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. देशात कोरोनाच्या संसर्गामुळे येत्या 1 ऑगस्टपर्यंत 10 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं ब्रिटनमधील प्रख्यात वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’ने म्हटलं आहे.

10 लाख किंवा त्याहून अधिक माणसांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याचं इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशनया संस्थेने म्हटलं आहे. तर जर अशी स्थिती ओढवली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं ते सर्वांत मोठं अपयश असेल, असंही या नियतकालिकाने आपल्या संपादकीयात म्हटलं आहे.

आरोग्य क्षेत्रातील घडामोडींवर संशोधन करणारी ही जागतिक दर्जाची स्वतंत्र संस्था आहे. तिने केलेल्या भाकिताचा हवाला देत कोरोनावर प्रारंभीच्या काळात मिळवलेल्या यशाने भारताचा वारू उधळला होता. कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या कृती गटाची त्यामुळे एप्रिलपर्यंत बैठकच झाली नव्हती, असं लॅन्सेट नियतकालिकाने म्हटलंय.

धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असे वारंवार इशारे देण्यात येऊनही मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे असे कार्यक्रम, जाहीर सभांमध्ये लाखो लोक उपस्थित राहिले. त्यामुळे कोरोना संसर्ग प्रचंड फैलावला

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *