
सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोनाची बाधा
मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाचं जगभरात थैमान सुरू असताना आता बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाने एन्ट्री घेतली आहे. बच्चन आणि खेर यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अशातच अभिनेत्री सारा अली खानच्या वाहन चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला कॉरन्टाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
सारा अली खानच्या वाहन चालकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे. सुदैवाने या सगळ्यांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. इन्स्टाग्राम पोस्ट करत तिने ही माहिती आहे.
“माझं कुटुंब, घरातील स्टाफ आणि माझी कोरोना चाचणी केलीये. आमच्या सगळ्यांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीदेखील आम्ही काळजी घेत आहोत. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून बीएमसीचे मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला लगोलग मदत केली आणि यातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवला. सगळ्यांनी काळजी घ्या”, असं साराने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, चार दिवासंपूर्वी अभिनेता अभिषेच बच्चन, शहेनशाह अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन तसंच ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या कार चालकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे.