सरकारच्या नाकर्तेपणामुळेच राज्यात कोरोनाची वाढ : शिरपूर भाजपा

Featured धुळे
Share This:
शिरपूर : कोविड 19 महामारीवर प्रभावी उपाययोजना आणि प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याने राज्यात आरोग्य अराजक पसरले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा जबरदस्त विळखा राज्याला बसत आहे. कोविडचा विषाणू अकार्यक्षम, सुस्त सरकारी यंत्रणेला पोखरून काढत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, दुर्दैवाने मृत्यू वाढत आहेत. असे भाजपा शिरपूरचा वतीने आ. काशिराम पावरा व भाजपा माजी धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नायब तहसिलदार गणेश आढारी यांना (दि.१९. मे) रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, तेली समाज युवक प्रदेश उपाध्यक्ष शांमकांत ईशी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे, कृउबा समिती संचालक अॅड. प्रताप पाटील, हेमराज राजपुत, विक्की चौधरी, अरविंद्र बोरसे, हिरालाल कोळी, विनायक कोळी, गणेश माळी आदी उपस्थितीत होते.
आता या लोकांच्या जीवावर उठलेल्या मुर्दाड सरकारच्या विरोधाचे सरकारच्या विरोधात निषेध करण्यात येत आहे.  त्यासाठीच भाजपातर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. वास्तविक या आरोग्य आणीबाणीच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक यांनी समान पातळीवर येऊन काम करणे अपेक्षित होते. पण दुर्दैवाने राज्य सरकारला दिखावा करायचा आहे काम नाही हे राज्यातील जनतेचे दुर्भाग्य म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेला मृत्यूशय्येवर नेणाऱ्या सरकारला आता जाब विचारण्याची वेळ आली असुन राज्यात राज्य सरकारने कोविड १९ महामारीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तातडीने पावले उचलुन जनतेला या महामारीपासुन मुक्त करावे असे आ. काशिराम पावरा व भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थितीत नायब तहसिलदार गणेश आढारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

LEARN EASY PHYSICS – MISSION PHYSICS 

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *