
सामुहिक शक्तीच्या जोरावर कोरोना संकटावर विजय शक्य : सरसंघचालक
नागपूर (तेज समाचार डेस्क) : जागतिक कोरोना संकट आणि देशव्यापी संचारबंदीच्या छायेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी एका विशेष कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधला. रविवारी या शेष ‘ डिजिटल ‘ बौद्धिक
वर्गाचे थेट प्रसारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यु-टुयब तसेच फेसबुक हॅन्डल द्वार करण्यात आले. वर्तमान परिस्थिती आणि संघाची भूमिका यावर बोलताना भागवत म्हणाले की, सध्याचा काळ भारतासह संपूर्ण विश्वासाठी परीक्षेचा काळ असून या वैश्विक संकटाचा सामना नागरिकांनी सर्व शक्ती आणि विश्वासासह करावयास हवा . भागवत म्हणाले की , कोरोना सारखे संकट शतकात पहिल्यांदाच आले यामुळे अनेक नव्या बाबी समोर आल्या असून आगामी काळात यासंदर्भात विविध क्षेत्रात याचा विचार करवा लागणार आहे.
कोरोना युद्धात भारत सरकार आणि अन्य यंत्रणांच्या तत्परतेने उत्तम कार्य केले असून वेळेत योग्य पाऊले उचलल्यामुळे मोठी हानी टाळता आली तरीही नागरिकांनी जागृत राहून यातून बाहेर पडण्यासाठी सज्ज राहावे. भागवत म्हणाले की संघाच्या सेवा कार्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असून समाज संघाकडे पाहतो आहे. उत्तम समाजाची निर्मिती हे संघाचे स्वप्न असून अशा प्रकारच्या कार्याची माहितीचा प्रचार झाल्यास अनेकांना प्रेरणा
प्राप्त होते. आपल्या लोकांची सेवा करणे कर्तव्यच असून यात उपकार असे काहीच नाही मात्र जो पर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोवर कार्यरत आणि सज्ज राहावे असे आवाहन सरसंघचालक यांनी केले.
भागवत म्हणाले की कोरोना संकटाची तीव्रता लक्षात घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एप्रिल ते जून महिन्या दरम्यान होणा-या जवळपास 90 पेक्षा जास्त संघशिक्षा वर्ग आणि इतर सार्वजनिक आणि सामूहिक कार्यक्रमांना रद्द केले आहे. देशव्यापी संचारबंदीमुळे संचाची शाखा बंद असली तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर सामाजिक संस्था देशाच्या कानाकोप-यात सेवा कार्य करीत आहे. स्वयंसेवक कोणत्याही प्रसिद्धीसाठी हे कार्य
करीत नसून आपलेपणाची भावना तसेच राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या कार्यात सहभागी आहे.