कोरोना मुळे गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती गंभीर

Featured देश
Share This:

कोरोना मुळे गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती गंभीर

मुंबई (तेज समाचार डेस्क) : एस.पी. बालसुब्रमण्यम हे नाव सिनेसंगीतात अत्यंत अदबीने घेतलं जातं. त्यांनी आपल्या गाण्यांनी भारताला मंत्रमुग्ध केलं. पत्थर के फूल, हम आप के है कौन, बागी, साजन, रोजा आदी शेकडो चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं आहे. 90 च्या दशकामध्ये अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना अभिनयाचीही आवड होती. हम से है मुकाबला या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे. एलया राजा, ए.आर. रेहमान, नदीम-श्रवण, जतीन ललीत आदी अनेक संगीतकारांकडे त्यांनी काम केलं आहे. हिंदीसह तमीळ, तेलुगु, मल्याळम आदी भाषांत 40 हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे. एस.बी. बालसुब्रमण्यम यांना 5 ऑगस्टला कोरोनाचं निदान झालं होतं. त्यांना तातडीने चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत होते. अचानक गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी आयसीयूत हलवण्यात आलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *