
कोरोनामुळे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे कामकाज निंबाच्या झाडाखालून
कोरोनामुळे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे कामकाज निंबाच्या झाडाखालून
एकाच दिवसात पंधरा हजाराची दंडात्मक कारवाई.
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): कोरोनामुळे सोशल डिस्टन्स कायम ठेवण्यासाठी यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आपल्या कॅबिन ऐवजी पोलीस स्टेशन आवारातच असलेल्या एका निंबाच्या झाडाखाली खुर्ची टाकून पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेत आहेत. पोलीस स्टेशन आवारात हवेशीर मोकळ्या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेताना तसेच पारदर्शकता दिसून येत असल्याने सर्व स्तरातून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या नवीन कल्पकते बाबत कौतुक करण्यात येत आहे.
काल दिनांक 30 शनिवार रोजी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संपूर्ण यावल शहरात बेधडक मोहीम राबवून तोंडावर , नाकावर माक्स न वापरणार्या दुचाकी वाहनधारक व इतर नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल करून एकूण 30 जणांकडून 15 हजार रुपये दंड वसूल करण्याची कडक कारवाई केली.