
केवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाही- WHO
केवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाही- WHO
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): संपूर्ण जगभरात कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनामुळे जवळपास 1.3 दशलक्ष लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठं विधान केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनॉम घेब्रेसस यांच्या सांगण्यानुसार, केवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाहीये. ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या विषाणूशी लढण्यासाठी कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणून काम करेल. पंरतु केवळ लस ही स्वतः महामारी संपवू शकत नाही.
तसंच येत्या काळात या विषाणूचं अस्तित्व कायम राहील. त्यामुळे रूग्णांच्या चाचण्या होणं, त्यांना क्वारंटाइन करणं, ट्रेसिंग आणि डिस्टंसिंग पाळणं आवश्यक असणार असल्याचं, ते म्हणालेत.