
यावल शहरात तब्बल 8 दिवसानंतर कोरोनाचा पॉझिटिव्ह 1 रुग्ण
यावल शहरात तब्बल 8 दिवसानंतर कोरोनाचा पॉझिटिव्ह 1 रुग्ण
यावल ( सुरेश पाटिल ): यावल शहरात तब्बल 8 दिवसानंतर आज दिनांक 21 रविवार 2020 रोजी सकाळी एक 67 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
यावल शहरात यावल ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, यावल नगरपरिषद कर्मचारी आणि संबंधित शासकीय यंत्रणा कोरोना विषाणू बाधा कोणाला होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत त्या प्रमाणे दिनांक 13 ते दिनांक 15 जून 2020 पर्यंत 3 दिवसाचा जनता कर्फ्यू नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या आव्हानानुसार यावलकरांनी काटेकोरपणे पाळला याचा सकारात्मक फायदा यावल करांना दिसून आला आहे, आता पुन्हा 3 किंवा 5 दिवसाचा जनता कर्फ्यू सर्व नागरिकांनी पाळावा जेणेकरून कोरोना विषाणू यावल शहरातून हद्दपार होईल असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
यावल शहरात गेल्या महिन्या पासून आज दिनांक 21 जून 2020 पर्यंत एकूण 38 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 15 रुग्ण कोरोनावर मात करून घरी सुखरूप परतले आहेत, 17 रुग्ण कोविड सेंटरला दाखल आहेत, तर 5 जणांचा कोरोना बाधेमुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.
यावल तालुक्यात एकूण 84 गावांपैकी 19 गावांत तथा ग्रामीण भागात कोरोना विषाणूने प्रवेश केला आहे, त्यात एकूण यावल शहरासह येथे 108 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 45 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते रुग्ण सुखरुप घरी परतले, 51 रुग्ण कोविड सेंटरला दाखल आहेत, तालुक्यात आतापर्यंत एकूण 12 रूग्ण मयत झाले आहेत. अशा सर्व वस्तुस्थितीवर यावल तालुका आरोग्य विभाग, यावल ग्रामीण रुग्णालय, न्हावी ग्रामीण रुग्णालय,आणि तालुक्यात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, यांच्यासह यावल नगरपालिका, फैजपुर नगरपालिका मुख्याधिकारी व त्यांचे नगरपरिषद कर्मचारी हे प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, तहसीलदार यावल जितेंद्र कुंवर यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या आदेशानुसार अहोरात्र परिश्रम घेत आहेत.