यावल शहरात कोरोना बाधित 1 पुरुष व एका महिलेचा मृत्यू

Featured जळगाव
Share This:

तिरुपतीनगर व सुदर्शन चित्रमंदिर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित.
धोक्याची घंटा वाजल्याने संपुर्ण यावल शहरात खळबळ

         यावल  (तेज समाचार प्रतिनिधि): यावल शहरातील तिरुपतीनगर मधील राहणार कोरोना बाधित एका पुरुषाचा बुधवार दिनांक 20 रोजी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर यावल येथीलच नवीन वस्तीतील एक 58 वर्षीय महिलेचा मृत्यू आज दिनांक 21 गुरुवार रोजी सकाळी झाल्याने संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे. सुदर्शन चित्रमंदिर चौकात एक 20 वर्षीय तरुण आढळून आल्याने सुदर्शन चित्र मंदिर परिसर व तिरुपती नगर काल दिनांक 20 रोजी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज सकाळी महिलेचा मृत्यू झाल्याने पूर्णवाद नगर सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले जाणार आहे किंवा नाही ? याकडे सुद्धा यावल शहराचे लक्ष वेधून आहे.
अति वर्दळ असलेल्या सुदर्शन चित्रमंदिर परिसरात एका 20 वर्षीय तरुणासह शहरालगतच्या पूर्णवाद नगर वसाहतीत एक 58 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने दिनांक 19 मंगळवार रोजी संध्याकाळी संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली होती, यानुसार सुदर्शन चित्र मंदिर परिसर मंगळवार रोजी रात्रीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे तिरुपती नगर मधील एक भाजीपाला विक्रेता 45 वर्षाचा कोरोना बाधित इसमाचा जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये औषध उपचार सुरू असताना काल दिनांक 20 रोजी सकाळी मृत्यू झाल्याने त्याच्यावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले परंतु तो यावल येथील तिरुपती नगर मधील राहणार असल्याने काल संध्याकाळी तिरुपतीनगर सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.
तसेच दिनांक 19 रोजी संध्याकाळी पूर्णवाद नगर मधील 58 वर्षीय महिला  पॉझिटिव्ह आढळून आली होती तिचा आज दिनांक 21 रोजी सकाळी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून पूर्णवाद नगर हे सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाणार आहे का ? याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे. प्रशासनातर्फे प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यावल तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बऱ्हाटे हे परिस्थितीवर नियंत्रणासाठी प्रयत्नशील असले तरी यावल शहरासह परिसरात कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने यावल शहरासह संपूर्ण परिसरात धोक्याची घंटा वाजली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 उपचार करणाऱ्या डॉक्टरांना क्वारंटाईन  करण्याची मागणी

कोरोना रुग्णांवर यावल शहरात व ग्रामीण भागात ज्या ज्या डॉक्टरांनी औषध उपचार केले असतील त्यांना होम  क्वारंटाईन करण्यात यावे अशी मागणी यावल शहरातील मेडिकल असोसिएशन तर्फे यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

फैजपूर येथील कोविड केअर सेंटर मध्ये सुविधांचा अभाव

       कोरोना बाधित रुग्णांशी जे जे नागरिक संपर्कात आलेले आहेत अशा नागरिकांना फैजपूर येथील कोविड केअर सेंटर मध्ये रवाना करण्यात येते, कोविड केअर सेंटर मध्ये पाहिजे त्या आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध उपलब्ध होत नसल्याने तेथे दाखल असलेल्या नागरिकांमध्ये शासनाविषयी तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *