देवपूरातील एका परीक्षा केंद्रा बाहेर कॉपीबहाद्दरांचा कॉपी पुरवण्यावरून धुडगुस

धुळे
Share This:

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): धुळे येथे बारावीच्या परीक्षा सुरू आहे. परीक्षा केंद्राबाहेर कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट सूरुच. भरारी पथक नेमके करते तरी काय हा एक प्रश्नच आहे. आज दुपारी गुरुवारी तीन ते सहाच्या दरम्यान देवपुरातील एका महाविद्यालय मध्ये बारावी परीक्षा केंद्रावर  उर्दू माध्यमाच्या पेपर सुरू होता. वर्गातील एका मित्राला कॉपी देण्यासाठी त्याचे दोन मित्र मोटर सायकल वरून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील रस्त्यावर येऊन उभे राहिले.याच वेळी अन्य एक मित्र बाहेर उभा होता त्याला हे दोन जण कॉपी घेऊन आल्याची माहिती मिळाली त्याचवेळी तो दुसऱ्या मित्राला कॉपी द्यायची आहे.तू तू आणलेले कागद मला दे तूला दुसऱ्याला कोणाला देता येणार नाही .असे त्याला धमकावले यातूनच दोघांमध्ये बाचाबाची होऊन  दोघांमध्ये  गेटजवळ भांडण सुरू झाले. दोघांचे भांडण विकोपाला जायला लागले एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला लागले. प्रवेशद्वाराजवळ काही अंतरावर बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या पोलीस दादाने हे पाहताच दोघांना तेथूनच हात वारे करून त्यांना हटकाला तो लागला परंतु ते तेथून दूर जायला तयार नव्हते. दोघांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला. परिस्थिती नियंत्रणात आणली दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला.परंतू दोघेजण तिथून त्यांचा हात झटकून बाजूला असलेल्या मोटरसायकलवर बसून दोघांनी पोबारा केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही वेळ शाळेच्या समोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

नेमका विद्यार्थी कुठला कुठल्या वर्गात होता हे दोघे कोणाला कॉपी पुरवायला आले होते याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. कॉपी प्रकरणावरून नेमका काय वाद झाला. आणि वादाचे रूपांतर तुंबळ मारामारीत झाले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत देवपूर पोलिस ठाण्यांमध्ये उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *