यावल तालुक्यातील हरिपुरा धरणाचे सांडव्याच्या निकृष्ट कामाबाबत पत्रव्यवहार केल्याचे कारणावरुनलघु पाटबंधारे अभियंत्यास ठेकेदाराने दिली धमकी

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यातील हरिपुरा धरणाचे सांडव्याच्या निकृष्ट कामाबाबत पत्रव्यवहार केल्याचे कारणावरुन
लघु पाटबंधारे अभियंत्यास ठेकेदाराने दिली धमकी.

महेंद्र पाटील यांच्या विरोधात
जळगाव येथील रामानंदनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल कारवाई गुलदस्त्यात.

यावल (सुरेश पाटील): यावल तालुक्यातील हरिपुरा धरणाचे सांडव्याच्या निकृष्ट कामाबाबत भुसावळ येथील लघुपाटबंधारे बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता एन.टी.आढ़े हे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तसेच वलय कंट्रक्शन यांच्याकडे पत्रव्यवहार करीत असल्याच्या राग येऊन वाईट वाटून मे.चक्रधर कॉन्ट्रॅक्टर्स अँण्ड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड जळगाव संचालक महेंद्र पाटील यांनी सोमवार दि.5एप्रिल 2021रोजी संध्याकाळी भ्रमणध्वनीवरून धमकी दिली की तुमची बदली करून घ्या व उद्यापासून माझे साइटवर हरिपुरा येथे पाय ठेवू नका अशी धमकी दिली.या कारणावरून कनिष्ठ अभियंता एन.ए.आढे यांनी जळगाव येथील रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे रामानंद नगर पोलिसांनी काय चौकशी आणि कार्यवाही केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात अडकून आहे या घटनेमुळे संपूर्ण तापी महामंडळ विभागात,लघु पाटबंधारे बांधकाम उपविभागात,जळगाव पाटबंधारे विभागात,गिरणा पाटबंधारे विभागात अधिकारी-कर्मचारी यांच्यात एकच खळबळ उडाली असून त्या ठेकेदाराच्या मागे पाटबंधारे विभागातील एका निवृत्त बड्या अधिकाऱ्याचा मोठा आशिर्वाद आणि जवळचे नाते संबंध असल्याने जळगाव जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
कनिष्ठ अभियंता एन.टी.आढे यांनी दिनांक5 एप्रिल2019रोजी उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे बांधकाम यांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की,चक्रधर कॉन्ट्रॅक्टर्स व इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड महेंद्र पाटील यांनी भ्रमण दूरध्वनी वरून तुमची बदली करून घ्या उद्यापासून माझे साइटवर हरिपुरा येथे पाय ठेवू नका अशी धमकी दिली आहे वरील बाबींमुळे माझी मनस्थिती अत्यंत खराब झालेली असून त्यामुळे मी माझ्या जिवाचे काही बरेवाईट केल्यास त्यास महेंद्र पाटील यांना जबाबदार धरण्यात यावे सदर बाब आपले माहितीसाठी व पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सादर करीत असल्याचे नमूद केले आहे.
कनिष्ठ अभियंता एन.टी.आढे
यांच्या तक्रार अर्जानुसार भुसावळ येथील लघु पाटबंधारे बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता अ.न.तपासे यांनी दि.7 एप्रिल2021 रोजी कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग जळगाव यांना दिलेल्या लेखी पत्रात कनिष्ठ अभियंता नितीनकुमार आढे यांचा दि. 5 एप्रिल2021रोजीच्या अर्जाचा व रामानंद पोलीस स्टेशन जळगाव येथील अदखलपात्र गुन्हा नोंद दि.7/4/2021संदर्भ देऊन तसेच कंत्राटदाराकडून धमकीची भाषा वापरून दरडावणे बाबतच्या विषयान्वये दिलेल्या पत्रात म्हटले आहे की कनिष्ठ अभियंता आढे यांनी महेंद्र पाटील मे चक्रधर कॉन्ट्रॅक्टर्स अँण्ड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड जळगाव यांनी दि.5एप्रिल 2021रोजी संध्याकाळी5वाजून12 मिनिटांनी कनिष्ठ अभियंता आढे यांना भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या संभाषणात दरडावण्याचा प्रयत्न केला असल्याचे तसेच त्यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास त्यास महेंद्र पाटील यांना जबाबदार धरण्यात येणे बाबत कळविले आहे,त्यानंतर दि.6/4/ 2021संध्याकाळी5वाजून10 मिनिटांनी उपविभागीय अभियंता लघु बांधकाम उपविभाग भूसावळ यांना महेंद्र पाटील यांचा भ्रमणध्वनी आला व त्यातदेखील भुसावळ येथील लघु पाटबंधारे बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता अ.न.तपासे यांना कामाबद्दल आपण थेट वलय कंट्रक्शन प्राइवेट लिमिटेड यांच्याशी पत्रव्यवहार का करत आहात याबाबत धमकावण्याचा भाषेत बोलत होते परंतु वाद टाळण्याच्या दृष्टीने उपविभागीय अभियंता यांनी सदरचा भ्रमणध्वनि बंद केला.(याबाबत भ्रमणध्वनी मुद्रण उपलब्ध आहे).
याबाबत सारासार विचार करता कनिष्ठ अभियंता नितीनकुमार आढे यांच्या अर्जाचा विचार करता कनिष्ठ अभियंता आढे हे तक्रारदार म्हणजे उपविभागीय अभियंता अ.न. तपासे हे साक्षीदार होऊन आज रोजी रामानंद पोलीस ठाणे जळगाव येथे महेंद्र पाटील यांचे विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याच्या नोंदीचे प्रत प्राप्त झाली आहे ती या पत्रासोबत सादर करण्यात येत आहे,तसेच सदर बाबतीत आपले मार्फत तसेच वरिष्ठांनी मार्फत सदर ठेकेदार विरुद्ध योग्य ती कारवाई होणेबाबत हा उपविभाग विनंती करत आहे हे आपल्या माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सादर करीत असल्याचे भुसावळ येथील लघु पाटबंधारे बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता अ.न.तपासे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले असून या पत्राच्या प्रति माहितीस्तव तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक,तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता.यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मे.चक्रधर कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड संचालक महेंद्र पाटील हे पाटबंधारे विभागातील एका निवृत्त वरिष्ठ धिकार्‍याचे जवळचे नातेवाईक आहेत.या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या आमदार खासदार मंत्री यांच्याशी हितसंबंध असल्याने आजही या निवृत्त अधिकार्याचा धबधबा संपूर्ण तापी पाटबंधारे विभागात राज्यात असल्याने तसेच शासकीय कामकाजात निविदा काढणे कामकाजात अधिकाऱ्यांना यांचे मार्गदर्शन घ्यावे लागत असल्याने अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तसेच अनेक ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांच्यात मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे सीबीआय,लाचलुचपत विभागाने लक्ष केंद्रित करून संबंधितांवर कारवाई करावी असे संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह राज्यात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *