देशातील सर्व पेट्रोल पंपावर लवकरच चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या विचारात

Featured देश
Share This:

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क):  देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जास्तीत जास्त वाढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. काही महिन्यांपूर्वीच दिल्ली सरकारने ईव्ही पॉलिसीअंतर्गत इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांचा मार्ग सोपा केला होता. सरकार आता देशातील ६९,००० पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा विचार करत आहे. तसेच राज्यातील सर्व रिफायनरी कंपन्यांना पेट्रोल पंपावर ईव्ही चार्जिंग कियॉस्क अनिवार्य करण्याच्या दिशेने काम करत आहे. ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झालेल्या एका चर्चेत तेल मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सल्ला दिला की, सर्व COCO पेट्रोल पंपावर चार्जिंग कियॉस्क स्थापन करण्याचे आदेश जारी करू शकतात. त्यातच अन्य फ्रेंचायसी पेट्रोल पंपावर कमीत कमी एक चार्जिंग स्टेशन असावे, असं त्यांनी सांगितले.

या बैठकीत दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, वडोदरा आणि भोपाळ या मुख्य शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे. कारण दूर जाण्यासाठी लोकांना इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास करता येईल.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *