काँग्रेस सेवा फाउंडेशन जिल्हाध्यक्षकडून पत्रकारास दमदाटी

Featured जळगाव
Share This:

काँग्रेस सेवा फाउंडेशन जिल्हाध्यक्षकडून पत्रकारास दमदाटी

पोलिस पाटीलाची तक्रार आणि बातमी लागल्याने संताप.

कोरोनाग्रस्त मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेत शंभर लोक.

यावल ( सुरेश पाटील ): गोदावरी मध्ये कोरोनालाच लागली राजकीय लागण. तसेच कोरोनाग्रस्त मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेत शंभर लोकांची गर्दी झाल्याने पोलीस पाटील यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याच्या कारणावरून दिनांक 2 जुलै 2020 गुरुवार रोजी बातमी प्रसिद्ध झाल्याचे मृत व्यक्तीचा मुलगा तथा काँग्रेस सेवा फाउंडेशन जळगाव जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांस वाईट वाटल्याने त्याने आपल्या मोबाईल वरून पत्रकारास शिविगाळ,दमदाटी केल्याने खरोखरच कोरोनाला संतापाची राजकीय लागण झाल्याचे दिसून येत आहे. याकडे काँग्रेस ज्येष्ठ नेते मंडळींनी वस्तुस्थिती लक्षात घेता काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून तसेच सामाजिक व राजकीय हिताच्या दृष्टिकोनातून आपल्या पदाधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करायला पाहिजे असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की कोरपावली येथील पोलीस पाटील सलीम रमजान तडवी यांनी दिनांक 2 जुलै 2020 रोजी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केलेले आहे. या आदेशान्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोदावरी हॉस्पिटल नशिराबाद येथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून मयत सत्तार नथू पटेल ( काँग्रेस सेवा फाउंडेशन जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांचे वडील ) यांचे प्रेत covid-19 कोरोनाविषाणू संशयित मृत्यू असे घोषित करून प्लॅस्टिक मध्ये बंद करून दफनविधीसाठी त्याचा मुलगा जलील सत्तार पटेल याचे ताब्यात देऊन ते घरी न नेता प्रेतावर परस्पर कब्रस्तान मध्ये दफनविधीसाठी दिले असता मयत सत्तार नथू पटेल याचे प्रेतावर त्याचा मुलगा जलील सत्तार पटेल, जावेद मुश्ताक पटेल, मुबारक सलीम पटेल, इम्रान इक्बाल व इतर जवळपास 100 लोकांनी ते प्रेत घरी घेऊन जाऊन मयत सत्तार नथू पटेल याचे प्रेतावरील बांधलेले प्लॅस्टिक सोडून मयतास आंघोळ घालून सर्व विधी पूर्ण करून नंतर दफनविधीसाठी सुमारे 100 लोकांची गर्दी करून कब्रस्तान मध्ये घेऊन जाऊन दफन विधी केला व मयताचे प्रेता वरील प्लास्टिकची विल्हेवाट लावली आहे.
दफन विधीसाठी जास्तीत जास्त 20 लोक जमा व्हावे अशी अट असताना सुद्धा जवळपास 100 ग्रामस्थांची गर्दी करून प्रेत कब्रस्तान मध्ये घेऊन जाऊन दफन विधी केला आहे. याकरीता मयताचा मुलगा जलील सत्तार पटेल यांनी त्याचे वडील covid-19 संशयित मृत घोषित केले असल्याचे माहित असताना सुद्धा त्याने त्याचे नातेवाईकासह जवळपास 100 लोकांना जमवून माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी जारी केलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 चे उल्लंघन केले आहे म्हणून याबाबतची तक्रार कोरपावली तालुका यावल येथील पोलीस पाटील सलीम रमजान तडवी यांनी यावल पोलीस स्टेशनला केलेली आहे यावल पोलिसांनी काय कार्यवाही केली हे अद्याप न समजल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या तक्रारीमुळे आणि दिनांक 2 जुलै 2020 रोजी या संदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्याने काल दिनांक 20 रोजी रात्री 10 वाजून 57 मिनिटांनी काँग्रेस सेना फाउंडेशन जिल्हाध्यक्ष जलील पटेल याने आपले स्वताचे मोबाईलवरुन पत्रकार यांना शिवीगाळ दमदाटी केल्याने दमदाटी करणाऱ्या विरुद्ध पत्रकार संघटनांमार्फत तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
कोरपावली येथील पोलीस पाटील रमजान तडवी यांच्या तक्रारीनुसार यावल पोलिसांनी कोणती कार्यवाही केली आहे किंवा नाही ? याबाबत सुद्धा पत्रकार संघटनांमार्फत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *