‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा

Featured मुंबई
Share This:

‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा

मुंबई  (तेज समाचार डेस्क): काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा काँग्रेस प्रदेश प्रभारी एच.के.पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना दिला आहे.

एच.के.पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबईच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी एच.के.पाटील बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाबाबत विधाने करणारे त्याचा घटकही नाहीत इतक्या महत्वाच्या राजकीय आघाडीच्या कारभारात नाक खुपसणे शहाणपणाचे नाही, असा टोलाही पाटील एच. के पाटील यांनी राऊतांना लगावला.

पक्ष वाढीसाठी मिशन मोडवर काम केलं जाणार असून शंभर दिवसांच्या कार्यक्रमात पदयात्रांच्या माध्यमातून 227 वाँर्डातील कार्यकर्ते आणि तळागाळातील जनतेपर्यंत पोहचणार असल्याचं पाटील म्हणाले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *