
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त यावल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कडुन कोरोना योद्ध्यांचा सन्मान
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त यावल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कडुन कोरोना योद्ध्यांचा सन्मान
यावल ( सुरेश पाटील ) : सध्या संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. ही महामारी कमी व्हावी म्हणून महाराष्ट्रा मध्ये आपले सरकार तत्परतेने काम करत आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे जाऊन समाजासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर , आरोग्य सेविका , गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व ऋण व्यक्त केले आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्य अध्यक्ष रविद्र नाना पाटील यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्यावेळी हिंगोणा प्राथमिक केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी , डॉ मुकेश सुफे , घनश्याम डोळे , अशोक तायडे, कैलास कोळी, एस जे सोनवणे , वैशाली तळले, कामिनी किंरगे,पूनम गावडे , ज्योती भावरे , आणि आशा वर्कर , व अंगणवाडी सेविका कर्मचारी यांचा सत्कार युवक राष्ट्रवादी काँग्रेस यावल यांच्यातर्फे करण्यात आला.
राष्ट्रवादी युवक काँगेस चे तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील, गुणवंत निळ उपजिल्ह्या अध्यक्ष राज कोळी. सरचिटणीस विनोद पाटील , सरचिटणीस प्रशांत पाटील , विध्यार्थी अध्यक्ष राकेश सोनार , लीलाधर चौधरी , जितेंद्र निळ , सुभाष पाटील , शरीफ तडवी , हितेश गजरे , भिकन मराठे , सुनील इंगडे , शब्बीर खान , आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
कार्यक्रमाचे नियोजन युवक अध्यक्ष ऍड देवकांत पाटील केले होते.