नंदुरबार जिल्हा परिषदेची काँग्रेस शिवसेना सत्ता हातातून जाता जाता राहील

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार जिल्हा परिषदेची काँग्रेस शिवसेना सत्ता हातातून जाता जाता राहील

नंदुरबार (प्रतिनिधी वैभव करवंदकर): नंदुरबार जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत सत्ताधारी काँग्रेसचे शिवसेनेचे सदस्य गैरहजर असल्यामुळे भाजपच्या सदस्यांनी मतदान घेण्याचा आग्रह धरला होता. काँग्रेसचे-5 व सेनेचे-6 सदस्य गैरहजर राहिल्याने सत्ताधार्‍यांमध्ये नाराजी पसरली होती. मतदान झाले असते तर काँग्रेस शिवसेनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे पद धोक्यात आले असते . एकंदरीत काँग्रेस शिवसेनेची सत्ता हातातून निसटली असती.  नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात काल मंगळवारी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेला जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी, बांधकाम सभापती अभिजीत पाटील, शिक्षण सभापती ज्योती पाटील, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. कोरोना विषाणू चे डोक्यावर टांगती तलवार असताना. सदस्य / अधिकारी सभेत गैरहजर राहणे योग्य नाही . आश्या परिस्थितीचा फायदा घेत भाजपाचे सदस्यांनी मतदान घेण्याची मागणी केली . सभेप्रसंगी सत्ताधारी काँग्रेस व शिवसेनेचे 20 सदस्य आणि विरोधी भाजपाचे सर्व 25 सदस्य उपस्थित होते. या सभेमध्ये सत्ताधारीतील काँग्रेसचे 5 व शिवसेनेचे 6 असे एकूण 11 सदस्य गैरहजर होते. यावेळी विषय पत्रिकेवरील 26 विषय मंजूर करण्यावर विरोधी भाजपाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. कारण, मागील सभेवेळी इतिवृत्तात विषय नसतांना भाजपाच्या सदस्यांची नावे अनुमोदक व सूचक म्हणून टाकून परस्पर कामे मंजूर केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी सभागृहात सत्ताधार्‍यांवर केला. सभेत मंजूरी व इतिवृत्तात न घेतलेली कामे परस्पर मंजूर झालीच कशी? असा प्रश्न उपस्थित करीत भाजपाच्या सर्वच सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सदरचे सर्व विषय नामंजूर करुन केवळ कोरोना संबंधित विषयांवर चर्चा करुन मंजूर करण्याची मागणी भाजपाच्या सदस्यांनी सभागृहात केली. तसेच काँग्रेस व शिवसेनेचे 11 सदस्य गैरहजर असल्याने सभेसाठी मतदान घेण्यात यावे, अशीही मागणी विरोधकांनी लावून धरली. यावर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना बोलण्यास सांगितल्यावर त्यांनी मी फक्त मार्गदर्शन करु शकतो, असे सांगितले. सत्ताधार्‍याकडून जिल्हा परिषदेत मनमानी कारभार सुरु असून विरोधी सदस्यांची नावे टाकून परस्पर कामे मंजूर केल्यावरुन दिसून येत असल्याने भाजपाच्या सदस्यांनी मागणीचा तगादा लावत एक गदारोळ केला. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी सभेत मतदान घ्यावे, अशी मागणी करताच जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी यांनी सभा आटोपल्याचे सांगत सभागृहात काढला पाय घेतला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *