
यावल: सारी ऐवजी कोरोना रिपोर्ट मुळे जनतेमध्ये संभ्रम
सारी ऐवजी कोरोना रिपोर्ट मुळे जनतेमध्ये संभ्रम
प्रतिबंधित क्षेत्रात सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये संताप.
जिल्हाधिकारी, प्रांत यांचे यावल मुख्याधिकाऱ्यावर नियंत्रण नाही.
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): ता.प्र. तालुक्यात काल दिनांक 28 पर्यंत कोरोना पॉझिटिव म्हणून आढळून आलेले एकूण रुग्ण 13 आहेत, तर तालुक्यात यावल शहरातील 2 कोरोना ग्रस्तांचा मृत्यू झाला आहे, तसेच 8 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना ग्रस्त मयत एका रुग्णाचे मेडिकल डेथ ( मृत्यू ) सर्टिफिकेट नंबर 374 प्रत्यक्ष बघितले असता सदरची व्यक्ती सारी या आजाराने मयत झाली असल्याची स्पष्ट नोंद आहे परंतु ही व्यक्ती कोरोना विषाणुमुळे मयत झाल्याचे दिनांक 20 मे 2020 रोजी प्रसिद्ध झाले असल्याने संपूर्ण यावल तालुक्यातील जनतेमध्ये आरोग्य खाते व नगरपरिषद यावल बाबत संभ्रम निर्माण झाला असून कोरोना आणि सारी या महाभयानक विषाणू बाबत शासनाने तात्काळ जाहीर खुलासा करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
यावल शहरात सर्वात प्रथम दिनांक 20 में रोजी तिरुपती नगर मधील एका व्यक्ती कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याचे शासकीय स्तरावरून प्रसिद्ध झाल्याने यावल नगरपरिषदेने तिरुपती नगर तात्काळ सील करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले, त्यानंतर पूर्णवाद नगर, सुदर्शन चित्रमंदिर परिसर, बाबूजीपुरा, देशपांडे गल्ली, आणि त्यानंतर जिनिंग प्रेस व्यापारी संकुलनातील डॉक्टर धिरज चौधरी यांचे हॉस्पिटलचा परिसर सील करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले, यावेळी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी कर्तव्यदक्षतेचा फार मोठा देखावा सादर करून वरील सर्व ठिकाणचे भाग सील केले, सिल करताना मुख्याधिकारी तडवी यांनी भेदभाव करून काही निवासी घरांचा भाग सोडून आरोग्य विभागाच्या निकषांना, अटी-शर्ती न जुमानता यावल शहरातील चार ते पाच ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील ठोकले आहे.
संबंधित भागात सील ठोकल्यानंतर आठ दिवसानंतर प्रतिबंधित क्षेत्राला नंबर देण्यात आले हे अनुक्रमे नंबर क्रमवारी पद्धतीने दिलेले आहेत का ? प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना यावल नगरपरिषदेने आज दिनांक 29 शुक्रवार पर्यंत कोणतीही प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी कोणतीही कार्यवाही किंवा पर्यायी व्यवस्था केलेली नाही त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना दूध, भाजीपाला, औषधी इत्यादी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे, ओला व सुका कचरा वाहतूक करणारे वाहन अनियमित केव्हा कुठे आणि कसे येऊन जाते हे कोणाला समजत नाही प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे सिल ठोकलेले असल्यामुळे त्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहना पर्यंत नागरिकांना कचरा घेऊन जाता येत नाही ही वस्तुस्थिती असताना यावल नगरपालिकेने किंवा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहना सोबत इतर कोणताही साफ सफाई कर्मचारी ठेवलेला नाही, इत्यादी सुविधा देणे कामी यावल नगरपरिषदेने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून जिल्हाधिकारी जळगाव, फैजपुर उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांचे यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांचेवर नियंत्रण राहिलेले आहे किंवा नाही असे सुद्धा संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
कोरोना आणि सारी एकच आहे का ?
संपूर्ण जगासह भारतात कोरूना विषाणूमुळे हाहाकार माजला असून संपूर्ण शासकीय, राजकीय, सामाजिक, यंत्रणा कामात व्यस्त आहे, परंतु यावल शहरातील एका कोरोना ग्रस्त रुग्णाचा मयताचा मृत्यूचा दाखला / डेथ सर्टीफिकेट प्रत्यक्ष बघितले असता म्युनिसिपल कॉर्पोरेशन जळगाव शहर यांनी दिलेल्या मृत्यू सर्टिफिकेट मध्ये सारी या रोगाची नोंद केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, परंतु शासनाने हा रुग्ण कोरणा बाधित मृत्यू झाल्याचे प्रसिद्ध केले होते आणि आहे, त्यामुळे कोरोना आणि सारी हे आजार एकच आहेत का ? दोघा आजारांचे सिमटनस एकच आहेत का ? याबाबत जिल्हास्तरावरील आरोग्य विभागासह संपूर्ण शासकीय यंत्रणेने याचा जाहीर खुलासा जनतेच्या माहितीसाठी करून जनतेमधील निर्माण झालेला संभ्रम दूर करावा अशी मागणी तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून होत आहे.