धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रात 14 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन : जिल्हाधिकारी संजय यादव

Featured धुळे
Share This:

महानगरपालिका आयुक्तांनी शिथिलतेबाबत 12 मे पर्यंत अहवाल सादर करावा

धुळे, दि. 8  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. मात्र, शेजारील मालेगाव (जि. नाशिक), अमळनेर (जि. जळगाव), सेंधवा (जि. बडवानी) तसेच धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने धुळे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात 14 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 14 मे 2020 नंतरच्या लॉकडाऊन शिथिलतेबाबत धुळे महानगरपालिका आयुक्तांनी व्यापारी संघटनांशी चर्चा करून 12 मे 2020 पर्यंत आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

sanjay-yadav
जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या दालनात आज सायंकाळी लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे विशेष कार्य अधिकारी प्रशांत ठाकरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत 10 मे 2020 पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित झाला आहे. मात्र, कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून 14 मे 2020 पर्यंत धुळे महानगरपालिका कार्यक्षेत्रात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. यादरम्यान, महानगरपालिका आयुक्तांनी राज्य शासनाच्या 3 मे 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार महानगरपालिकेने व्यापारी संघटनांबरोबर चर्चा करून ज्या- ज्या आस्थापना सुरू करता येतील, अशा बाबतीत चर्चा करून अहवाल सादर करावा. महानगरपालिकेच्या अहवालानंतर आणि कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची तेव्हाची संख्या पाहता लॉकडाऊन शिथिल करावयाचे किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल. सदरचे आदेश ग्रामीण भागास लागू राहणार नाहीत, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. लॉकडाऊन हा नागरिकांच्या सुरक्षितेसाठीच आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे. मास्कचा वापर करावा. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी. नागरिकांनी घरीच राहत सुरक्षित राहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी केले.

 

 

Video describes DIVISIBILITY test for ICSE GRADE 6 ,in lucrative and simple method

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *