
नायगाव येथील ग्रामसेवकाबबत सदस्यांच्या तक्रारी? बिडिओ कार्यवाही केव्हा होणार?
नायगाव येथील ग्रामसेवकाबबत सदस्यांच्या तक्रारी? बिडिओ कार्यवाही केव्हा होणार?
उपसरपंचासह 6 ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार
ग्रामसेवकांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर?
यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक हे सरपंचांस हाताशी धरून संगनमताने मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार उपसरपंचासह6सदस्यांनी जळगाव जिल्हा परिषदेकडे केलेली आहे यात ग्रामपंचायत कार्यालयाचे कुठलेही काम करताना आम्हाला विश्वासात घेत नाही,मनमानी करून सर्व निर्णय ते स्वतः घेतात,मासिक सभेला सुद्धा ग्रामसेवक हजर राहात नाही व नंतर येऊन सर्व विषय त्यांच्या मर्जीनुसार प्रोसिडिंगवर नमूद करतात,मासिक सभेमध्ये मागील विषय घेत नाही,त्यामुळे यात काहीतरी घोटाळा असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे, याबाबत विचारणा केली असतांना संबंधितांकडून अरेरावीची उत्तरे मिळतात.अशा प्रकारची लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. दरम्यान तक्रारदारांनी सदर ग्रामसेवक व सरपंचांच्या कारभाराविषयी अनेकदा वरीष्ठांनकडे लेखी तक्रार अर्ज करूनही अद्यापही या कुठलीही कारवाई झालेली नाही तरी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी निलेश पाटील आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी असताना आतापावतो ग्रामसेविका विरुद्ध कारवाई का झालेली नाही? असे अनेक प्रश्न ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये उपस्थित केले केला जात आहे.
याबाबत लेखी निवेदनानुसार सविस्तर माहिती अशी की नायगाव ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती विचारली असता,ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांचे कडून स्पष्ट नकार मिळतो.प्रत्येक प्रश्न हा लेखी अर्ज करूनच विचारावा असे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. तर मासिक सभेमध्ये झालेल्या खर्चाची बिले मागणी करूनही अवलोकनासाठी सभेपुढे ठेवत नाही.ग्रामपंचायतीचा कर-वसुली भरणा बँकेत केला जात नसून तो परस्पर खर्च केला जातो. त्यानुसार आम्ही सभेच्या अजेंड्यावर जमा-खर्च नमूद करण्याची मागणी केलेली आहे. ती सुद्धा मागणी अमलात आलेली नाही तसेच तसेच ग्रामपंचायतीच्या विविध विषयांची योग्य अशी माहिती मिळत नाही. कामापेक्षा जास्तीचा खर्च दाखवून बाकी रक्कम गहाळ केली जात आहे.ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे हे मासिक सभेला गैरहजर राहूनही दडपशाहीने कारभार करतात या गैरकारभाररास त्वरित आळा बसावा व ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व बदली करण्यात यावी.अशी मागणी उपसरपंच सौ. सोनल रामदास पाटील यांच्यासह 6ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे.दि.31 मे 2021रोजी सदर तक्रारी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद (जळगाव)यांच्याकडे देण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे सदर ग्रामपंचायतीच्या गैरकारभार विषयी संबंधित पदाधिकाऱ्यांनी दि.29जून2021रोजी तहसीलदार(यावल)यांच्याकडे सुद्धा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे या तक्रार अर्जात म्हटल्या,नुसार ग्रामपंचायतीच्या मालकीची शेती गट क्रं.269अशी मालमत्ता आहे सदर शेताच्या बांधावर 70ते 80 झाडे होती ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतांना फक्त सदर झाडांच्या फांद्यांची छाटणी करायचे असे ठरले होते मात्र प्रत्यक्षात सरपंच व ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांनी संगणमत करून सदर शेताच्या बांधावरील सर्व झाडे कुठलीही परवानगी न घेता तोडून टाकली आहे.
त्याचप्रमाणे यावल येथील गटविकास अधिकाऱ्यांना तब्बल तीन तक्रारअर्ज दिलेले आहे त्यात म्हटल्यानुसार असे की,मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या आदिवासी बारेला कुटुंबियांच्या नावे घरकुल योजनेअंतर्गत काही घरकुल मंजूर करुन बांधकाम सुरू आहे तथापि सदरील बारेला कुटुंब यांचे गावाच्या मतदार यादीत सुद्धा नाव नाही व त्यांचा साधा रहीवासही नाही अशा लोकांना घरकुल मंजूर करून गावातील पात्र लोकांना सरपंच व ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांनी घरकुल योजनेपासून वंचित ठेवलेले आहे.त्याचप्रमाणे गावालगत निमछाव नावाची आदिवासी वस्ती उदयास आलेली असून या ठिकाणी बोगस घरकुलांची सर्रासपणे बांधकाम सुरू आहे तसेच पैशांची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण सुद्धा झालेली असून याची देखील सखोल चौकशी व्हावी अशी दि.23जून2021रोजीच्या निवेदनात मागणी केलेली आहे. असे अजब व गज़ब व्यवहार सदर ग्रामपंचायतीत सुरू आहे अशी रितसर तक्रार दि.29जून2021 रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे व सरपंच यांच्या गैरकारभाराविरुद्ध व उपसरपंच व6ग्रामपंचायत सदस्य यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही.तरी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
★ग्रा.पं.ची वरीष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी-संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पी.डी. सैंदाणे व सरपंच यांच्या गैरकारभाराविरुद्ध उपसरपंच सौ सोनल रामदास पाटील तसेच उत्तम सपकाळे, ज्योती देशमुख, रमाबाई कोळी, राजू तडवी, महेंद्र तडवी, अलिशानबाई तडवी या सहा ग्रामपंचायत सदस्यांच्या लेखी तक्रारीवरून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील व तर अधिकार्यांच्या पथकाने चौकशीसाठी दि.5रोजी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली मात्र चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
★ ग्रामसेवका ऐवजी शिपायाच्या उपस्थितीत मासिक सभा.
सदर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे हे मासिक सभेला गैरहजर राहतात.यावेळी ते आपल्या गैरहजेरीत ग्रामपंचायत शिपाई यांना मासिक सभा घेण्यासंदर्भात सांगून जातात त्यानुसार सदर ग्रामपंचायतीची मासिक सभा शिपाई घेत असतात हे ग्रामपंचायतीचे फार मोठे दुर्दैव आहे.अशा प्रकारच्या ग्रा.पं. कारभाराकडून गावाच्या कुठल्या प्रकार सर्वांगिण विकासाची अपेक्षा करावी?असा प्रश्न आम्हाला आणि ग्रामस्थांना पडलेला आहे.यासह ग्रामसेवक व सरपंच यांचे अनेक प्रकारचे गैरव्यवहार आम्ही लेखी निवेदनाद्वारे वरिष्ठ प्रशासनाकडे कळविले आहे मात्र अद्याप यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही तथापि येत्या काळात सदर प्रकरणावर कुठलीही नि:पक्षपातीपणे कारवाई न झाल्यास आम्ही तक्रारदार सर्वजण जिल्हा परिषद ,जळगाव समोर आमरण उपोषण करू
असे उपसरपंच सौ.सोनल रामदास पाटील यांनी सांगितले आहे.
जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांच्याकडे लेखी तक्रारी असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरून नायगांव ग्रामसेवक सैंदाणे यास वाचविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न संबंधित अधिकारी करीत असल्याने त्यांनी तक्रार अर्जानुसार चौकशी आणि कार्यवाही न केल्यास लवकरच नायगाव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण,आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे.