
यावल नगरपालिकेकडून अनधिकृत वृक्षतोड केल्याची तक्रार
यावल नगरपालिकेकडून अनधिकृत वृक्षतोड केल्याची तक्रार.
नगराध्यक्षा तथा वृक्ष समिती अध्यक्षा काय कार्यवाही करणार ?
यावल (सुरेश पाटील): यावल नगरपालिका कार्यालयाचे भिंतीजवळ असलेल्या दोन जुन्या मोठ्या झाडांची अनधिकृतपणे कत्तल करण्यात आली असल्याची तक्रार करून रीतसर पंचनामा करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दीपक बेहेडे यांच्यासह शेख अलीम मोहम्मद रफीक यांनी केली आहे राजपत्रातील आदेशानुसार नगरपालिका अध्यक्ष हेच वृक्ष समितीचे अध्यक्ष असतात त्यामुळे यावल न.पा.अध्यक्ष सौ.नोंशाद तडवी काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
दिनांक 26/12/2020 रोजी यावल नगरपरिषद नगराध्यक्षा, उपविभागीय अधिकारी फैजपुर भाग,यावल पूर्व वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत दीपक बेहेडे व शेख अलीम यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अ मध्य उप-विभाग दिनांक 14 डिसेंबर 2009 या अधिनियम व शासन राजपत्र नुसार नगरपालिका नगराध्यक्ष हे वृक्ष समितीचे अध्यक्ष असतात.असे असताना देखील यावल नगरपरिषद संबंधितांनी यावल नगरपालिका कार्यालयाजवळील दोन जुने व मोठे वृक्ष अनधिकृतपणे कत्तल करून टाकली याकडे यावल नगरपालिका मुख्याधिकारी यांचे सुद्धा दुर्लक्ष झाले आहे,तक्रार अर्जाची दखल प्रांताधिकारी फैजपुर भाग,तहसीलदार यावल यांनी घेऊन दिनांक 19/1/2021 रोजी मंडळ अधिकारी यावल यांना आदेश काढून यावल नगर परिषद कार्यालयाजवळील अनधिकृत वृक्ष कत्तलीबाबत रीतसर पंचनामा करावा असे कळविल्या नुसार मंडळ अधिकारी यावल यांनी दिनांक 20/1/2021रोजी पंचनामा केला. पुढील कार्यवाही काय होते ?तसेच यावल नगरपालिका अध्यक्ष तथा वृक्ष समितीचे अध्यक्ष सौ.तडवी या सुद्धा काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.