किनगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या दलीत वस्तीच्या कामांनबाबत पिआरपीकडून गटविकास अधिकार्‍यांकडे केली तक्रार.

Featured जळगाव
Share This:

किनगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या दलीत वस्तीच्या कामांनबाबत पिआरपीकडून गटविकास अधिकार्‍यांकडे केली तक्रार.

यावल (सुरेश पाटील): किनगाव खुर्द ग्रामपंचायती कडून दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजुर झालेल्या निधीतुन दलीत वस्तीची मंजुर कामे सोडून दुसरी कडेच निधी खर्च करून कामे केली जात आहे.अशी तक्रार पंचायत समितीकडे पीआरपी कडून करण्यात आली असुन तात्काळ या कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.यावल पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांच्या कडे पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे यावल तालुकाध्यक्ष राहुल बापू साळुके व जिल्हा प्रतिनिधी रतन रमेश साळुंके यांनी दिलेल्या निवेदनाच्या लिखित तक्रारीनुसार म्हटले आहे की किनगाव खुर्द ता. यावल ग्रामपंचायती कडे सुमारे20 लाखांचा निधी हा दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत प्राप्त झाला आहे या निधीतुन दलीत वस्तीत विविध विकास कामे होणे आवश्यक होते मात्र सदरची कामे ही फक्त कागदावरच असून प्रत्येक्षात मात्र हा निधी दुसऱ्याच जुन्या कामावर डागडूगीच्या नावाखाली ग्रामपंचायतच्या वतीने सुरु आहे . ग्रामपंचायतच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे दलीत समाजाच्या वस्ती विकासासाठी राखीव असलेला निधीचा दुरुपयोग करून इतर ठिकाणी डागडुगीच्या नांवाखाली कामे सुरू आहे या कामांची त्वरित चौकशी होऊन तात्काळ सदर काम थांबविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच आठवड्याभरात चौकशी न केल्यास पंचायत समितीवर मोर्चा आणून जन आंदोलन करण्याचा इशारा पिपल्स रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या यावल तालुकाशाखाच्या वतीने निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *