अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोग सदस्य यांच्याकडे यावल पोलिसांविरुद्ध तक्रार

Featured जळगाव
Share This:

अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोग सदस्य यांच्याकडे यावल पोलिसांविरुद्ध तक्रार.

यावल ( सुरेश पाटील): ता.प्र. तक्रारीनुसार यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला नाही म्हणून तसेच पोलीस कर्मचारी जातिवाचक शिवीगाळ करून माझ्यावर अन्याय अत्याचार करीत असल्याची लेखी व समक्ष तक्रार यावल येथील माजी नगरसेवक जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस विजय सुपडू गजरे यांनी केली
दिनांक 26/2/2021रोजी अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या तक्रार अर्जात माजी नगरसेवक विजय गजरे म्हटले आहे की यावल पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी 5 हजार रुपयांची खंडणी मागून, मारहाण करून, दहा ग्रॅम सोन्याची अंगठी व घड्याळ हिसकावून मला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण व पोलीस स्टेशन मध्ये डांबून ठेवून माझ्यावर अन्याय अत्याचार करणारे पोलीस कर्मचारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी अशी तक्रार करण्यात आली आहे

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *