जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची बदली ?
जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची बदली ?
अधिकारी कर्मचारी यांच्या पाचवीलाच पुजलेली असते बदली.
आनंद किंवा वाईट वाटून घेण्याचा प्रश्नच नाही.
यावल ( सुरेश पाटिल ): जळगाव जिल्हाधिकारी म्हणून सांगली येथील जिल्हा परिषदेचे सीईओ अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची चर्चा आज दिनांक 13 शनिवार रोजी जिल्ह्यात काही व्हाट्सअप ग्रुप , यूट्यूब चैनल वरून व्हायलर झाली जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या बदली संदर्भात संध्याकाळ पर्यंत कोणताही लेखी आदेश प्राप्त झालेला नसताना चर्चेला मोठे उधाण आले असले तरी शासकीय, अधिकारी कर्मचारी यांच्या पाचवीलाच त्यांच्या बदलीची पूजा निश्चित झालेली असते त्यामुळे आनंद किंवा वाईट वाटून घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांना जबाबदार धरून बदली झाल्याची जोरदार चर्चा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सुरू झाली परंतु कोरोना विषाणू बाबतीत ग्रामीण, शहरी, तालुका व जिल्हा स्तरावरील किती लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार नागरिकांसमोर लोकसेवकाची भूमिका निभावून जनजागृती केली आहे किंवा नाही हा राजकीय, सामाजिक संशोधनाचा विषय आहे, कोरोना विषाणू बाबत 90% जनजागृती ही आरोग्य विभाग, पोलिस अधिकारी, कर्मचारी, महसूल विभाग अधिकारी, कर्मचारी, विभागाने करून प्रत्यक्ष कृती करून जनतेची सेवा करून जनजागृती केली आहे, यात अनेक समाजसेवकांनी आणि काही लोकप्रतिनिधींनी सुद्धा गरीब जनतेला सर्वतोपरी मदत केली आहे, यात तर काही समाजसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी मदत कार्य केले परंतु प्रसिद्धी केलेली नाही हे विशेष.
जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी कोरोना विषाणू च्या आचारसंहितेत जळगाव येथील आमदाराचे व जिल्ह्यातील अनेक मातंबराचे बियरबार परवाने रद्द करुन प्रस्थापितांना मोठा कायद्याचा दणका दिला होता आणि आहे, तसेच काही प्रकरणांमध्ये राजकारण्यांना त्यांच्या सोइनुसार पाहिजे तसा प्रतिसाद न दिल्यामुळे राजकारणात काही गटात मोठा असंतोष पसरला होता त्यामुळे त्यांची बदली लवकरच होणार असे राजकीय चित्र निर्माण झाले होते आणि आहे काही असो डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या बदलीचा आदेश अजून प्राप्त न झाल्याने राजकीय स्टंटबाजी सुरू झाल्याचे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.