यावल तालुक्यातील चुंचाळे–बोराळे परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यातील चुंचाळे–बोराळे परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस,

आमदार लताताई सोनवणे यांच्या मतदारसंघात नैसर्गिक फटका.

विज पडून बैल जोडी ठार, दोन दुचाकी पुरात वाहिल्या.

यावल (सुरेश पाटील): तालुक्याूतील पश्चिम भागात चुंचाळे -बोराळे गावात सोमवार दि.7रोजी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.साडेपाच ते साडेसात या वेळेत वादळ वाऱ्यासह विजेचा कडकडाट मध्ये झालेल्या पावसात एका ठिकाणी वीज पडून बैल जोडी ठार झाली.तर प्रचंड वेगात आलेल्या पुरामध्ये दोन जणांच्या दुचाकी वाहून गेल्या असुन या भागातील गायरानवस्तीतील सुमारे दोनशे घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता.
सोमवारी सायंकाळी यावल,चोपडा विधानसभेच्या आणि यावल तालुक्याच्या पश्चिम भागात तसेच आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या कार्यक्षेत्रात नैसर्गिक फटका बसल्याने महसूल विभागामार्फत किती नुकसान झाले याबाबतची चौकशी कारवाई तात्काळ सुरू झाली आहे.
तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात मध्ये पाऊस झाला यात चुंचाळे -बोराळे व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गायरान भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.सुमारे दोन तास तुफान वेगात पावसाच्या सऱ्या बरसल्या तर बोराडे गावात वीज पडून सुरेश प्रल्हाद धनगर यांची बैल जोडी ठार झाली.एक लाख २० हजार रूपये किंमतीची सदरील बैल जोडी होती तर या घटनेत प्रत्यक्षदर्शी विनोद वानखेडे हे थोडक्यात बचावले तसेच चुंचाळे या गावात पुराचे पाणी प्रचंड वेगाने येत असतांना संजयसिंग राजपूत व रमेश पितांबर धनगर चुंचाळे या दोघांच्या दुचाकी पुरात वाहून गेल्या तसेच गायरान व चुंचाळे प्लॉट भागातील २०० हून अधिक घरात पाणी शिरले आहे.गायरान, चुंचाळे व बोराळे या गावांचा एकमेकाशी संपर्क हा रात्री उशिरापर्यंत तुटलेला होता पाऊस थांबल्यामुळे नागरिकांमध्ये थोडा दिलासा आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *