यावल शहरात विकसित भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने नागरिक वैतागले

Featured जळगाव
Share This:

यावल शहरात विकसित भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने नागरिक वैतागले.

योगा हॉल बांधकामात ठेकेदाराकडून भ्रष्टाचाराचा व्यायाम नगरपरिषदेचे दुर्लक्ष.

यावल (सुरेश पाटील) : यावल शहरातील संपूर्ण विकसित भागात गेल्या सहा महिन्यांपूर्वी पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईप लाईन टाकल्याने ठेकेदारांनी व्यवस्थित काम न केल्यामुळे संपूर्ण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालण्यासह दुचाकी वाहने चार चाकी वाहने चालविणे मुश्कील झाले आहे बऱ्याच वेळेला दुचाकी वाहने घसरून महिला पुरुष जखमी होत असल्याने आणि अविकसित भागातील खुल्या जागांवर कंपाउंड आणि योगा हॉलचे काम ठिकठिकाणी जे सुरू आहे क्या योगा हॉल बांधकामात ठेकेदारासह नगरपालिकेचा संगनमताने भ्रष्टाचाराचा बैल प्रकाराचा व्यायाम करण्यात आला ही कामे निकृष्ट प्रतीची झाल्याने याकडे यावल नगरपरिषद बांधकाम शाखा अभियंता यांच्यासह मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे. यावल नगर परिषदेने भागातील रस्त्यांवर मुरूम किंवा गिरवल इत्यादी साहित्य टाकून रस्ते तात्काळ वापरण्यायोग्य करावे आणि असे न केल्यास यावल नगर परिषदेसमोर लवकरच आंदोलन छेडले जाईल असा लेखी इशारा विकसित भागातील नागरिकांनी दिलेला आहे.
दि.2ऑगस्ट2021रोजी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना दिलेल्या निवेदनात गणपती नगर तिरुपतीनगर,वासुदेवनगर, चांदननगर,प्रभूलीला,चांदनगर, काजीनगर,आयेशानगर मधील नागरिकांनी यावल नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवीन वसाहतीमध्ये पावसाळ्यात चिखलाची मोठी समस्या निर्माण झाली आहे पाईप लाईन टाकल्यानंतरचे काम गेल्या सहा महिन्यात ठेकेदारांने न केल्यामुळे ठेकेदाराकडून मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे काम तात्काळ करून घ्यावे किंवा चिखलाच्या ठिकाणी मुरुम किंवा गिरावल इत्यादी साहित्य टाकून नागरिकांच्या रहदारीसाठी रस्ते पूर्ववत तयार करावेत आपण असे न केल्यास यावल नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले जाईल असा इशारा अशपाक शहा गफ्फार शहा, तसलीम सलीम पटेल,दानिश सादिक पटेल,आमिर कासम पटेल,अनिस युनिस पटेल, रियाजुद्दीन मोहम्मद हनीफ,रशिदखा भिखारीखा,हूजेर शेख,शोएब मुख्तार पटेल यांनी दिला आहे.
याच प्रमाणे यावल नगर परिषदेमार्फत विकसित भागातील ओपन स्पेस जागांवर वॉल कंपाऊंडचे आणि योगा हॉलचे जे बांधकामे होत आहेत ती बांधकामे अत्यंत निकृष्ट प्रतीची होत असल्याने यावल नगरपरिषद बांधकाम शाखा अभियंता आणि ठेकेदार संगनमताने भ्रष्टाचाराचा गैरप्रकारांचा योगा बांधकामात करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे तरी जिल्हाधिकारी जळगाव यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून यावल शहरातील विकसित भागात झालेल्या संपूर्ण कामांची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *