गलवान खोऱ्यातीन चिनी सैन्य माघारी!

Featured देश
Share This:

लडाख  (तेज समाचार डेस्क): गलवान खोऱ्यात गेले अनेक दिवस भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये तणावाचं वातावरण होतं. परंतू ते निवळण्यास आता हळूहळू सुरूवात झाली आहे. लडाखमध्ये चीनच्या सैनिकांनी मागे जाण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. गलवान येथून चिनी सैनिकांच्या गाड्या देखील मागे जात आहेत.

कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. पीएलए पीपी 14 येथून टेंट देखील काढण्याचं काम सुरु आहे.

चिनी सैन्य गलवान, हॉटस्परिंग आणि गोगरा सीमेवर मागे जाताना दिसत आहेत. चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले असले तरी चिनी सैन्य वाहने अजूनही या भागामध्ये आहेत.

दरम्यान, गेले काही दिवस भारताने चीनविरोधात अतिषय कठोर भूमिका घेतली होती. तसंच तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमू (लडाख) दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवताना चीनला कठोर इशारा दिला होता. विस्तारवादाचं युग संपून आता विकासवादाचं युग सुरू झाल्याचं त्यांनी चीनला सांगितलं होतं.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *