
चिमठावळ गावातील विहिरीत पडून तिघे भावंडांचा दुर्दैवी मृत्यू.
चिमठावळ गावातील विहिरीत पडून तिघे भावंडांचा दुर्दैवी मृत्यू.
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि): शेतातील विहिरीत पडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू.
शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ गावात दुपारच्या सुमारास देण्यासाठी गेली भावंडे घरी परतलीच नाही. तिघांचाही विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला रविवार वाऱ्हा घातवार ठरला यामुळे पिंपळगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चिमठावळ गावात रविवारी दुपारच्या वेळी घरातून तिघे भाऊ घरातल्यां मोठ्या व्यक्तींना सांगून निघाले की शेतातील खेळण्या चारापाणी देऊन येतो परंतु सायंकाळी उशिरा झाली घरीं आले घरातील नातेवाईकांना चिंता वाटू लागली त्यांनी परिसरात व गावात तिघे तरुण दिसले का याबाबत विचारपूस केली परंतु काही माहिती मिळाली नाही काळजीने नातेवाईकांनी शेताकडे वाट धरत जवळपासचे त्यांकडे पाहिले त्यावेळी एकाने सांगितले की अर्ध्या तासापूर्वी यांना मी शेतातील विहिरी कडे जाताना पाहिले होते त्यानंतर शेताजवळ विहिरीजवळ पाहिले असता तिथे जमिनीजवळ ओलावा दिसला मुलं दिसत नाही म्हणून काही जणांनी पटापट उड्या मारून पाहिले तेव्हा तिघे जण विहिरीत असल्याचे पट्टीच्या पोहणाऱ्या नागरीकाने सांगितले तेव्हा लगेच तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले व सोनगीर येथील ग्रामीण कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
यात 1)दीपक लीलाधर पाटील वय 11.02) गौरव लीलाधर पाटील वय10. हे दोघे सख्खे भावंडे विहिरीतील पाण्यात बुडून मयत झाली.3) दीपक ज्ञानेश्वर पाटील वय 14 हा एकुलता एक मुलगा होता तो हि पाण्यात बुडून मयत झाला.तिघांची ओळख पटलेली आहे.
दीपक ज्ञानेश्वर पाटील याला तहान लागली होती तो पाणी पिण्यासाठी विहिरीजवळ गेला असता पाय घसरून विहिरीत पडला त्याला वाचवण्याकरता दीपक लीलाधर पाटील पुढे सरसावला तोही पाण्यात पडला त्याला वाचवण्यासाठी गौरव लीलाधर पाटील हा पुढे धावला तोही पाण्यात पडला एकमेकांना वाचवण्यासाठी दोघे भावंडे पुढे सरसावले व पाण्यात पडली परंतु कोणीच कोणाचे जीव वाचू शकले नाही .तिघांचाही विहिरीतील पाण्यात पडून नाकातोंडात पाणी जाऊन जीव गुदमरून मृत्यू झाला. रविवार तिघांसाठी घातवार ठरला अशी चर्चा गावात सुरू होती. तिघांचंही दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.