
शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
मुंबई (तेज समाचार डेस्क): दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं नियम पाळून शाळा सुरू कराव्यात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरु करणं अडचणीचं आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु करावं, असा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शिक्षण विभागाच्या महत्वाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
जूनपासून शाळा सुरु होणार नसल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात येणार असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरु करता येणं शक्य आहे तिथे त्या सुरु करणं तसेच जिथं ऑनलाईन शक्य आहे तिथं त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झालं पाहिजे. मुलांचं वर्ष आम्ही वाया जाऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचं शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करुन देण्यात येईल, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.