
रस्ता बांधकाम वर्कऑर्डर निमित्त 28 हजाराची लाच घेतांना मुख्याधिकारी बबन तडवी रंगेहाथ पकडले गेले
यावल नगरपालिकेच्या टक्केवारीचे पितळ पडले उघडे.
रस्ता बांधकाम वर्कऑर्डर निमित्त 28 हजाराची लाच घेतांना मुख्याधिकारी बबन तडवी रंगेहाथ पकडले गेले.
यावल (सुरेश पाटील): आज दि.30शुक्रवार रोजी दुपारी1 वाजेच्या सुमारास यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांना यावल शहरातील वाणी गल्लीतील रस्ता बांधकाम करणे बाबतच्या वर्कऑर्डर संदर्भात ठेकेदाराकडून2टक्के दराने ठरलेली28हजार रुपयांची रोख रक्कम लाच घेताना रंगेहाथ पकडून अटक करण्याची कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली या कारवाईमुळे मात्र यावल नगरपालिकेचे टक्केवारीचे पितळ उघडे पडले आहे यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शहरात वाणीगल्लीत14 लाख रुपये इस्टिमेट असलेल्या रस्ता बांधकामाची वर्क ऑर्डर/कार्यारंभ आदेश देण्यासाठी 2 टक्के दराने28 हजार रुपयांची लाच मुख्याधिकारी बबन तडवी यांनी ठेकेदाराकडे मागणी केली होती याबाबत संबंधित ठेकेदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दिली त्यानुसार पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी व त्यांच्या पथकाने सापळा रचून यावल येथे नगरपालिका कार्यालयात येऊन तक्रार दाराकडून28हजार रुपयांची लाच मुख्याधिकारी बबन तडवी यांना स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली यामुळे यावल शहरात नगरपालिका वर्तुळासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
लाच स्विकारण्याचे प्लॅन
फिसकटले-यावल नगरपालिकेत एका निलंबित कर्मचाऱ्याच्या प्रकरणाची सुनावणी ठेवलेली होती या प्रकरणात सुद्धा चार ते पाच लाखाचा व्यवहार होणार असल्याचे यावल शहरात बोलले जात आहे परंतु आज लाचलुचपत विभागाचा ट्रॅप यशस्वी झाल्याने ती सुनावणी झाली नाही पर्यायी लाच घेणे फिस्कटले,तसेच बुधवार दि.4ऑगस्ट2021रोजी
अतिरिक्त साठवण तलाव कामासंदर्भात ठेकेदाराकडून 8 लाख रुपयांची लाच यावल नगरपालिकेत स्वीकारली जाणार होती तो सुद्धा लाच घेण्याचा प्लॅन आता फिसकटला याबाबत यावल नगरपालिकेतील अनेक कामांमधील गैरप्रकार,भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकामे अतिक्रमण निकृष्ट प्रतीची कामे अनियमितता,कर्तव्यात कसूर केला जात असल्याने अनेक तक्रारी प्राप्त असताना वेळेवर आणि तात्काळ कारवाया न झाल्यामुळे संपूर्ण यावल शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा प्रशासन अधिकारी नगर परिषद विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून यावल नगरपालिकेतील भोंगळ कारभाराची चौकशी करून कडक कारवाई करावी असे यावल शहरात बोलले जात आहे.