छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यावल तर्फे रावण दहनाचा कार्यक्रम रद्द

Featured जळगाव
Share This:

छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यावल तर्फे रावण दहनाचा कार्यक्रम रद्द

यावल  (सुरेश पाटील) : कोरोना परिस्थिती आणि सोशल डिस्टन्स लक्षात घेता यावल शहरात गेल्या 21 वर्षांपासून अखंड सुरू असलेला रावण दहनाचा कार्यक्रम विजया दशमी (दसरा) च्या दिवशी होणारा रावण दहण चा कार्यक्रम या वर्षी रद्द करण्यात आला आहे.
संपुर्ण देशामध्ये कोविड १९ कोरोना या रोगाने गेले सहा महीने पासून धुमाकूळ घातला आहे याबाबत आपण मोठा आपण संघर्ष करत आहेत आपल्या देशामध्ये कधीही बंद नसणारी रेल्वे,बस, मंदीरे,शाळा काॅलेज शासकीय कार्यालय,बाजार, दुकाने कोरोना पसरु नये म्हणून आपणास बंद ठेवावे लागले या वर्षीचे दहीहंडी,गणपती, नवरात्री असे उत्सव सण आपणास रद्द करावे लागले,
या कोविड १९ च्या कोरोना महामारी संघर्षां मध्ये आपण सर्वानी प्रशासनास सहकार्य केले सर्वानी आप आपल्यापरीने गोरगरीबाना जी मदत केली सहकार्य केले असे कोणत्याही देशामध्ये घडले नाही ते आपण करुन दाखवले आणि हळुहळु आपले जनजीवन पूर्वपदावर येत असतांना आपण आपल्या कुटूंबाची काळजी घ्यायची आहे अजुनही हे संकट टळलेले नाही दुर्दैवाने या रोगाचे बळी ठरलेले आपलेच कुणाचे वडील,जवळचे नातेवाईक मंडळी कुणाची आई तर कोणाचा करता मुलगा,मुलगी कुणाचे पती तर कुनाची पत्नी जवळचे काळजाचे व्यक्ती दुर्देवाने या आजाराचे बळी ठरले या सर्वांच्या दु:खात आपन सर्वच सहभागी आहोतच आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी घेतली पाहीजे शासनांच्या नियंमांचे या देशाचा सुज्ञ व्यक्ती म्हणून काटेकोरपणे पालन केले पाहीजे,
या महामारीचा प्रसंगी आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर व आरोग्यसेवक सुरक्षा पुरणारे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी,कर्मचारी, शिक्षक व शिक्षण संस्थानी व सेवाभावी संस्थाचे सेवक,राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सहकारी संस्थानाचे पदाधिकारी,व्यापारी, शेतकरी,मजुर या सर्व तळागळातील व्यक्तीनी या संकटात सहकार्य केले त्यांच्या विषयी कृतज्ञता दाखविले त्यांना लढण्याचे बळ दिले या सर्वाचे मि व माझ्या सहकार्याचें वतीने आभार व्यक्त करतो व आपणास सर्वांना उत्तम निरोगी आरोग्याचा शुभेच्छा देतो.
रावण दहणाचे कार्यक्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते व शासनाचा नियमानुसार सार्वजनिक कार्यक्रमास बंदी असल्याने तुर्तास ह्या वर्षी रावण दहणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी असे रावण दहण समितीचे वतीने यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले यांनी कळविले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *