लसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन

Featured जळगाव
Share This:

लसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन.

यावल (सुरेश पाटील):15 जानेवारी2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे परंतु यावल व रावेर तालुक्‍यातील अनेक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर्स यांना लसीकरण झाले नाही.त्यांची नावे सुद्धा यादीत आलेली नाही इतर क्षेत्रातील अनेकांना लसीकरण झाल्याचे व्हाट्सअप,फेसबुक वरून लक्षात येत असल्याने अंतःकरणाला खूप वाईट वाटते असे डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्याकडे दि.24/2/2021 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की15जानेवारी 2021पासून संपूर्ण भारतात आपत्कालीन लसीकरणाला सुरुवात झाली.यामध्ये डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी,आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण होणे अपेक्षित होते आणि आहे तरी सुद्धा20फेब्रुवारी2021पर्यंत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण होणे अपेक्षित असताना सदर तारीख उलटून सुद्धा लसीकरणाच्या यादीत नाव आलेले नाही यावल रावेर तालुक्यातील अनेक डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,ॲम्बुलन्स चालक लसीकरणापासून वंचित आहेत. प्राधान्यक्रम चुकवून अनेकांनी लसीकरण करून घेतलेले दिसत आहे,ज्याचे समाजात कवडीचे योगदान नाही असे अनेक लोक फेसबुक वर लसीकरण करत असतानाचे फोटो टाकतात तेव्हा आमच्या अंतःकरणाला खूप वाईट वाटतं कारण कोरोनाच्या काळात पेशंटला सर्वात जास्त सामोरे जाणारे आम्ही असतांना आता आम्हाला अशा पद्धतीने डावलून लसीकरण करणे योग्य नाही.प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना वेळोवेळी सहकार्य करून सुद्धा प्रशासन आमच्या बाबतीत गांभीर्य ठेवून नाही याचा आम्हाला खेद वाटतो तरी याची सखोल चौकशी करून आम्हा सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे ही विनंती करीत आहोत.
दिलेल्या निवेदनावर यावल येथील डॉ.कुंदन फेगडे,डॉक्टर विलास पाटील,डॉ.राजेश चौधरी डॉ.प्रशांत जावळे,डॉ.गौरव धांडे,डॉ.पराग पाटील,फैजपूर येथील डॉ.अभिजित हिवराळे,डॉ.प्रशांत अहिरे(विवरे), डॉ.सुधाकर चौधरी(निंभोरा), डॉ.चंद्रशेखर पाटील(सावदा), भरत महाजन(फैजपुर)डॉ.सुनील चौधरी,डॉ.रवींद्र भारंबे(चिनावल), डॉ.अविनाश बढे(सावखेड़ा बु.),डॉ.पंकज तळेले(सावदा),डॉ.शंतनु सरोदे,(सावदा),डॉ.नितीन महाजन,डॉ.अभिजीत सरोदे,डॉ. प्रशांत पाटील फैजपुर यांची स्वाक्षरी आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *