
प्रत्येक नागरिकांनी लस घेतली पाहिजे असे आव्हान – जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सीमा वळवी
प्रत्येक नागरिकांनी लस घेतली पाहिजे असे आव्हान – जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सीमा वळवी
नंदुरबार – ( वैभव करवंदकर )कोरोना पासून वाचण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी लस घेतली पाहिजे असे आव्हान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अँड . सीमा वळवी यांनी केले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी यांनी तळोदा तालुक्यातील वाल्हेरी रेवानगर पुनर्वसन, प्रतापपूर, सोमावल या आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी ग्रामीण भागात लसिकरनाची माहिती जाणून घेत ,आरोग्य केन्द्रा मधील औषध साठा ,ऑक्सीजन सिलेंडर याची पाहणी करुण योग्य त्या सूचना अधिकार्याना दिल्यात . यावेळी ऐड.सीमा वळवी यांनी सांगितले की जिल्हाभरात covid-19 आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग दिवसरात्र परिश्रम घेत आहे .आरोग्य विभागामार्फत प्रत्येक आरोग्य केन्द्राना योग्य साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घ्यावे, ज्या गावातील सरपंच उपसरपंच यांनी लस घेतली असेल त्यांनी इतरांना लसिकरण करण्यासाठी प्रोत्साहित करावे .काही नागरिक अफवा पसरवत आहे की, लसीकरण केल्याने कोरोना होतो पण ही अतिशय चुकीची माहिती असून लसीकरण केल्याने माणूस पूर्णपणे सुरक्षित होतो.म्हणून नागरिकांनी कोणत्याही अफवा वर विश्वास ठेऊ नये. नागरिकांनी सहकार्य केल्यानेच रुग्णांची संख्या आता कमी होत असताना दिसत आहे. म्हणून कोरोना पासून आपला व परिवाराचा बचाव करण्यासाठी नागरिकानी मोठ्या प्रमानात लसिकरण करुन घ्या असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी आरोग्य केन्द्राच्या भेटी दरम्यान सोमावल आरोग्य केन्द्रावर आरोग्य अधिकारी व आरोग्यसेवक यांच्या निवासस्थान जीर्ण झाल्याचे दिसून आले यावेळी जी. प. अध्यक्ष सीमा वळवी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले व इमारत त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश दिले .त्या सोबत सोमावल आरोग्य केंद्राची नवीन इमारत बाधन्यात येत आहे. याची पाहणी देखील जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी यांनी केली . यावेळी जि प सदस्य सुहास नाईक ,व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.