डॉ.चौधरी यांनी दिलेल्या आव्हानाला माजी आ. रघुवंशीचे प्रत्युत्तर

Featured नंदुरबार
Share This:

डॉ.चौधरी यांनी दिलेल्या आव्हानाला माजी आ. रघुवंशीचे प्रत्युत्तर

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : नंदुरबार नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेत कोरोनाचा पार्श्वभूमीवर विरोधकांनी सहा महिन्यांची घर पट्टी माफ करण्यासाठी नगराध्यक्षांकडे निवेदन केल्यामुळे ठराव झाला आहे. ह्या मुद्द्यावरुन राजकारण तापले होते. दूध का दूध , पानी का पानी झाले पाहिजे. डॉ.रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या आव्हानानुसार नगरपालिका ऑनलाइन सभेचा व्हिडिओ पत्रकारांना दाखवून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधकानां प्रत्युत्तर दिले. अॉनलाइन सभेचा व्हिडिओ दाखवून दूध का दूध , पानी का पानी केले आहे. नगरपरिषदेची ऑनलाइन सभा सुरु असताना भाजपाच्या एकही नगरसेवकाने सहा महिन्याची घरपट्टी माफ करण्याची मागणी केली नाही. असे असताना सभेत जे घडले नाही, त्याची बॅनरबाजी करून विरोधकांनी जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे, नगराध्यक्षांची हिंमत नाही पण इज्जत आहे, असा टोला शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे. नंदुरबार नगरपरिषदेची सर्व साधारण सभा दिनांक १६ अॉक्टोबर २०२० रोजी Video Conferencing व्दारे घेण्यात आली. त्या सभेत कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केले होते की , लॉकडाऊनच्या काळात घर भाडे , दुकानभाडे माफ करावे. ह्या आव्हानाला प्रतिसाद देत . चालु वित्तीय वर्षात जनतेच्या हितासाठी शहरातील नगर परिषद मालकीचे शॉपींग सेंटर , ओटे , दुकानगाळे याचे माहे एप्रिल , मे , जून २०२० चे भाडे माफ केले आहे. तसेच शहरातील मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराचे बिल मिळालेपासून ३० दिवसाच्या आत संपूर्ण प्राँपर्टी टँक्स भरल्यास अशा मालमत्ता धारकांना निव्वळ मालमत्ता करात १० टक्के सुट देण्याचा ठराव मंजूर केला आहे. जनतेने ह्या योजनेचा लाभ घ्यावा.
नगरपरिषदेची ऑनलाइन सभा नुकतीच झाली आहे. त्यात सहा महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा ठराव झाल्याचे बॅनर भाजपाच्या विरोधी गटाने ठीक ठिकाणी लावले आहेत. डॉ.रवींद्र चौधरी यांनी देखील एक पत्रक काढून हिम्मत असेल तर सभेचे चित्रीकरण दाखवण्याचे आव्हान नगराध्यक्षांना केले होते. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या परिवारातील भूखंडावर देखील गंभीर आरोप चौधरी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी केलेले सर्व आरोप खोडून काढले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *