
चाळीसगाव: शास्त्री नगरातील गणपती मंदिराची दानपेटी लांबवली
शास्त्री नगरातील गणपती मंदिराची दानपेटी लांबवली
मागील महिन्यात मंदिरातून सव्वा किलोचा चांदीचा गणपतीची मूर्ती चोरी
चाळीसगाव (तेज समाचार प्रतिनिधि ) : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या शास्त्री नगरातील इच्छापूर्ती गणपती मंदिराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोंडून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील जवळपास 30 किलो वजनाची लोखंडी दानपेटी चोरून नेल्याची घटना दि 3 रोजी पहाटे उघडकीस आली आहे.
कोरोना आजाराची दहशत सर्वत्र सुरू असल्याने नागरिक लवकर दरवाजे बंद करून झूपी जातात याचाच फायदा चोरट्यांनी घेतला असून शहरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरातील चक्क दानपेटीच चोरून नेली आहे या दानपेटीत दान स्वरूपातील रक्कम असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली सकाळी हा प्रकार लक्षात आल्याने याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली आहे.
मागील महिन्यात देखील याच मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी चांदीचा गणपती सव्वा किलोचा चोरी गेला होता आता दानापेटीच चोरून नेल्याने चोरट्यांची नजर आता मंदिराकडे असल्याचे दिसून येत आहे.