
धुळे : चाळीसगांव पॅसेंजर अपघात होता-होता वाचली, अर्धातास रेंगाळली
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). मोहाडी उपनगरातील स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर असलेल्या मुंबई-आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रमांक तीन उड्डाण पुला जवळ पॅसेंजर गाडी येताच पुलाजवळ लावलेली लोखंडी जाळी हाय टेन्शन वायरवर कोसळली मोठा अनर्थ टळला.रेल्वे गेट अलीकडेच रूळावर पॅसेंजर अर्धातास रेंगाळली होती.
धुळे शहरात ब्रिटिशकाळापासून एक पॅसेंजर गाडी सुरू करण्यात आली.ती अगोदर कोळशाच्या इंजिन ने धावत होती.नंतर काही वर्षांत डिझेल इंजिन जोडले गेले व अता काही दिवसांपूर्वी च या मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण करण्यात आल्यावर ही पॅसेंजर गाडी विजेवर धावायला लागली. मंगळवारी तिसरी फेरी पॅसेंजर गाडी चाळीसगाव हून धुळ्याकडे मोहाडी उपनगरातील मोहाडी स्थानकातून धुळे स्थानकाडे येत असताना या मार्गावर बांधलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन मुंबई-आग्रा महामार्ग उड्डाणपुलावर बसवण्यात आलेली संरक्षक लोखंडी जाळी ही अचानक पणे पॅसेंजर गाडीवरती कोसळली. यावेळी लोखंडी वायरचा हाय टेन्शन तारेला संपर्क झाला.मोठा आवाज झाला व विजेच्या तारेवर लोखंडी जाळी कोसळल्याने स्पार्किंग झाले व ठिंणग्याहि आजूबाजूला उडाल्या पॅसेंजर गाडीतील प्रवासीही घाबरले परंतु इंजिनमधील चालकाने प्रसंगावधान राखत गाडीवर नियंत्रण मिळवून गाडी थांबवली. यानंतर स्टेशन मास्तर यांना याबाबत माहिती देण्यात आली.
त्यांनी तातडीने घटनास्थळी मदत पोहोचवली विद्युत पुरवठा खंडित करून हाय टेन्शन वर पडलेली लोखंडी जाळी मजुरांच्या मदतीने खालती काढण्यात आली. यात जवळजवळ अर्धा तास पॅसेंजर गाडी मार्गावर रेंगाळली होती त्यामुळे काही प्रवाशांची गैरसोय झाली वीज वाहक तारेवरील अडथळे दूर केल्यानंतर रेल्वे फाटकाजवळ काही वेळ अडकून पडलेली पॅसेंजर गाडी विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू केल्यानंतर स्थानकात दाखल झाली यावेळी पॅसेंजर गाडीची ही तिसरी फेरी होती या तिसऱ्या फेरीच्या वेळी अर्धा तास वेळ खर्ची गेला . स्थानकात येण्याकरीता पॅसेंजर गाडीला उशीर झाला परंतु यात कोणात्याही प्रवासाला इजा झाली नाही. कुठलाही मोठा अनर्थ घडला नाही . जिवीत हानी झाली नाही.यामुळे सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. काही मिनिटे पॅसेंजर गाडी स्थानकात थांबून चौथ्या फेरी करता धुळ्याहून परत गाडी प्रवासी सह चाळीसगाव कडे मार्गस्थ झाली.