
धुळे : धूम स्टाइलने महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावले
धुळे (तेज समाचार डेस्क). शहरात सोनसाखळी चोरटे परत सक्रिय झाले आहे. सविस्तर माहिती की, शहरातील देवपूर परिसरातील गोंदुर रोड वरील जिल्हा क्रीडा संकुल रस्त्यावर भाग्यश्री कॉलनीच्या फलकावर पर्यत राहते घरापासून पायी चालत फिरण्यासाठी आलेल्या ग्रुहिणीची गळ्यातील सोन्याची दिड तोळ्याची मंगल पोत रस्ता ओलांडताना पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर तोंडाला फडके बांधलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी धक्का देत गळ्यातून ओरबाडून धुम स्टाइलने पसार झाले.महिलेने आरडाओरड केली परंतु काही फायदा झाला नाही.रस्त्यावर असलेल्या शुकशुकाटाचा फायदा चोरट्यांना झाला.
जयश्री अशोक कुंवर वय.65.रा.पुरषोत्तम नगर ,प्लॉट.नं.36.चंद्रभागा सदन राहणाऱ्या महिलेने देवपूर पोलिस ठाणे गाठत दोन अज्ञात चोरट्यांनी धुम स्टाइलने दिड तोळे सोन्याची मंगलपोत ल़पास केल्या प्रकरणी लेखी तक्रार नोंद केली आहे. ज्येष्ठ महिलेने दिलेल्या लेखी तक्रार अर्ज नुसार देवपूर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि.संजय सानप करत आहे.