पक्षीशास्त्र, जैवविविधता, वन्यजीव संवर्धन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना 1 जुलै पासून प्रारंभ
जळगाव: समर्पण संस्था संचलित, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या वतीने 1 जुलै 2020 पासून पक्षीशास्त्र, जैवविविधता, वन्यजीव व वने संवर्धन या तीन अभ्यासक्रमांना प्रारंभ होत आहे. या अभ्यासक्रमांना कवयित्री बहीणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने मान्यता मिळाली आहे.
उत्तर महाराष्ट्र विभागात पहिल्यांदाच निसर्ग आणि वनसंवर्धन क्षेत्रातील अभ्यासक्रम कार्यान्वित करण्यात येत आहेत, त्यामुळे या क्षेत्रातील कार्यकर्ते, पक्षीमित्र, संशोधक, विद्यार्थी, वन अधिकारी, सामान्य नागरिक इ. ना ; आपल्या छंदाला शास्त्रीय आयाम देण्याबरोबरच विद्यार्थी आणि युवकांना करिअरची निवड करताना एक नवे हरित दालन उपलब्ध होणार आहे.
या अभ्यासक्रमाना महाराष्ट्रातील अनेक तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत यामध्ये प्रामुख्याने किशोर रिठे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, डॉ. वरद गिरी, अभय उजागरे, मयूरेश कुलकर्णी, अनिल महाजन, अमन गुजर मार्गदर्शन करणार आहेत , पहिल्या बॅचचा शैक्षणिक कालावधी 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 असा आहे.या अंतर्गत अॉनलाईन शिक्षण , क्लासवर्क, प्रात्यक्षिके, प्रकल्प, क्षेत्रभेट, कार्यशाळा परिसंवाद, शोध निबंध आदी पद्धती च्या माध्यमातून शिकविले जाणार आहे.
अभ्यासक्रमांच्या प्रवेशा संदर्भात अधिक माहीतीसाठी समन्वयक राहुल सोनवणे 9270076578 व संदीप झोपे 9404047034, अर्चना उजागरे 8830768120 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन पर्यावरण शाळेचे संचालक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.