
दोंडाईचा येथे संत नामदेव महाराजांची 750 वी जयंती साजरी
दोंडाईचा ( वैभव करवंदकर ): दोंडाईचा शिंपी समाज तर्फे संत नामदेव महाराजांची 750 वी जयंती साजरी करण्यात आली. शिंदखेडा तालुका दोंडाईचा परिसरातील असंख्य बंधू भगिनी कार्यक्रमात सामाजिक दुरी ठेवून , तोंडावर मास्क लावून संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. सदर प्रसंगी तालुका अध्यक्ष श्री शरद पवार यांनी सपत्निक प्रतिमा पूजन केले. महाराजांची आरती करण्यात येवून पसायदानानंतर प्रसाद वाटप झाले.
शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रविंद्र बाबा बागुल यांच्या संकल्पनेनुसार, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत नामदेव महाराज यांची 750 वी जयंती शिंदखेडा तालुका शिंपी समाजाच्या वतीने साधेपणाने साजरी करण्यात आली.
ह्या सोहळ्याला प्रा.प्रकाश भांडारकर (नामविश्व सह संपादक ), पांडुरंग शिंपी (प्रसिद्धी प्रमुख धुळे जिल्हा), सुरेश बागुल (म का सदस्य),प्रा. कैलास कापडणे (अध्यक्ष, संत नामदेव निराधार मदत संघ), रविंद्र खैरनार, गोवर्धन पवार तसेच सौ.वंदना भांडारकर (उपाध्यक्ष धुळे जिल्हा महिला आघाडी ),सौ.सुनिता शिंपी (प्रसिद्धी प्रमुख धुळे जिल्हा महिला आघाडी ),सौ.लिना पवार (अध्यक्ष शिंदखेडा युवती आघाडी) ,सौ. हेमलता पवार ( सदस्य, धुळे जिल्हा महिला आघाडी ),कु.महिमा पवार (सचिव,तालुका युवती आघाडी) आवर्जून उपस्थित होते.