नवरात्रोत्सव साजरा करा पण दांडिया, रावणदहन सारखे कार्यक्रमला बंदी – आयुक्त श्रावण हर्डीकर

Featured पुणे
Share This:

नवरात्रोत्सव साजरा करा पण दांडिया, रावणदहन सारखे कार्यक्रमला बंदी – आयुक्त श्रावण हर्डीकर

 

पिंपरी  (तेज समाचार डेस्क): गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या साथीत लक्षणीय अशी वाढ दिसली. हा अनुभव लक्षात घेता. येत्या नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना साथ रोगाचा अद्यापपर्यंत पूर्णतः नायनाट झालेला नाही. कोरोना गेलेला नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही. सार्वजनिक ठिकाणच्या उत्सवाला यावर्षी मुरड घालून साधेपणाने मात्र आंतरिक भक्तीभावाने नवरात्रोत्सव साजरा करावा. दांडिया, रावणदहन सारखे कार्यक्रम घेता येणार नाहीत. भक्तीभावाने आपापल्या घरातच देवीची पूजा करावी आणि निरोगी भवितव्याची प्रार्थना करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासीयांना केले आहे.

समाजमाध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन करताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीला आपण सामोरे जात आहोत. यामुळे शहराने अपरिमित नुकसान पाहिले आहे. अनेक नागरिक कोरोनाग्रस्त झाले आणि अनेक बरे देखील झाले. मात्र, काही जणांना या साथीत जीव गमवावा लागला आहे. गेल्या सहा महिन्यात शहरातील नागरिकांनी पालिकेला खूप चांगले सहकार्य केले आहे. या कालावधीत आपण अनेक गोष्टी अनुभवायला शिकलो आहोत.
जसे की गणेशोत्सवात आपण खूप प्रयत्नाअंती सार्वजनिक गणेशोत्सवाची अंमलबजावणी नियंत्रित केली. विसर्जनासह विविध कार्यक्रम नियंत्रित केले. तरी देखील गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या साथीत लक्षणीय अशी वाढ दिसली. हा अनुभव लक्षात घेता. येत्या नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना साथ रोगाचा अद्यापपर्यंत पूर्णतः नायनाट झालेला नाही. कोरोना गेलेला नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही.

कोरोना कधीही होऊ शकतो. अनेकांना अद्यापपर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही. होऊ नये यासाठी प्रत्येकालाच काळजी घेण्याची गरज आहे. विशेष अथवाने ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे वय 65 वर्षांहून अधिक आहे. अन्य दुर्धर आजाराने पीडित आहेत. त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे, सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
यासाठी नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणच्या उत्सवाला यावर्षी मुरड घालावी. साधेपणाने मात्र आंतरिक भक्तीभावाने नवरात्रोत्सव साजरा करावा. दांडिया, रावण दहन सारखे कार्यक्रम घेता येणार नाहीत. भक्ती भावाने आपापल्या घरातच देवीची पूजा करावी. निरोगी भवितव्याची प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *