
धुळे-नाशिक जिल्हा सिमेवर आता CCTV वॉच
धुळे (तेज समाचार डेस्क) : नाशिक जिल्ह्यात करोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच जवळच असलेल्या मालेगाव तालुक्यात आतापर्यंत २९ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे धुळे-नाशिक जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या रामनगर येथे सीसीटीव्ही लावण्यात आला असून धुळे पोलिस पथक, आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांकडून कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सिमा बंद करण्यात आल्या आहेत. धुळे-नाशिक जिल्हा सिमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील दोनजणांना करोनाची लागण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे धुळे जिल्ह्याच्या सर्व सीमेलगत असलेली गावांना सतर्क राहण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत. धुळे नाशिक सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नाशिक, मालेगाव, इतर शहरातून येणार्या प्रत्यक वाहनाचा नंबर घेऊन कुठून आले आहेत, कुठे जात आहेत, ओळखपत्र, वाहनात किती लोक आहेत, अशा प्रकारे वांहनाची चौकशी केली जात आहे. बेंद्रेपाडा, पुरमेपाडा, आर्वी हे गाव ही सीमेलगत आहेत याठिकाणी बाहेरील नागरिकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.