का रे दादू तु येथे काय करतोस ? असे बोलण्याच्या कारणावरूनमारहाण केल्याने 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव
Share This:

का रे दादू तु येथे काय करतोस ? असे बोलण्याच्या कारणावरूनमारहाण केल्याने 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

किनगांव बु. येथील घटना.

यावल ( सुरेश पाटील ) :का रे दादू तू येथे काय करतो? तुझे येथे काही काम नाही तू घरी जा असे बोलण्याचा राग आल्याच्या कारणावरून 3 जणांनी एका महिलेसह 2 जणांना मारहाण करून पाहून घेईल अशी धमकी दिल्याने यावल पोलीस स्टेशनला 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना काल दिनांक 28 मंगळवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास किनगांव बु. येथे घडल्याने रात्री 1:50 वाजता यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला.
किनगाव बु.येथील पुरुषोत्तम राजेंद्र पाटील वय 25 या मुलाने यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 28 मंगळवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास मुरली मोहन कोळी यांचे घरासमोर दादू कैलास कोळी राहणार किनगांव बु. यास मी बोलला की कारे दादू तू येथे काय करतो तुझे येथे काही काम नाही तू घरी जा असे बोलण्याचा राग आल्याच्या कारणावरून कैलास नामदेव कोळी याने माझे उजवे खांद्यावर काठीने मारहाण करून आकाश कोळी याने माझे साक्षीदार राजेंद्र निंबा पाटील वय 55 यांना डोक्यावर लोखंडी पाइप मारून दुखापत केली आहे तर दादू कैलास कोळी यांने मला स्वतःला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून माझी आई आशाबाईला लोटून देऊन तिन्ही आरोपीनी मला व साक्षीदार आणि माझ्या आईला शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली या कारणावरून कैलास कोळी, आकाश कोळी, दादू कोळी या तीन जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला भाग-५ गु.र.कर.१२८/२० कलम.३२४,३२३,५०४,५०६,३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विकास सोनवणे करीत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *