यावलमध्ये 16 भाजीपाला विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

Featured जळगाव
Share This:

यावलमध्ये 16 भाजीपाला विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

 

यावल ( सुरेश पाटील ): यावल शहरात भाजीपाला विक्रेते यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करून शहरात आजवर पोलीसांनी, ‘शहरात एके ठिकाणी न थांबता फिरून भाजीपाला विकण्यास दिलेल्या सुचनांचे वारंवार उल्लंघन करून, खिर्नीपुरा व बाजारपेठ इत्यादि गर्दिच्या ठिकाणी एकत्र जमून वाहतुकीस अडथळा करून कोव्हीड-१९ या आजाराचे संक्रमणास चालना दिले प्रकरणी एकूण १६ फळ-भाजीपाला विक्रेते यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे

यावल शहरातील खिर्निपुरा चौकात रोडचे बाजूला व मेन गल्लीत सोशल डिस्टंसिंग न पडता तोंडाला मास न बांधता शेख नसीम शेख युनूस, शेख रमजान शेख उस्मान, इस्माईल शेख उस्मान , शेख जावेद शेख गुलाब , जमील शहा , रईस शेख युनुस मधुकर पोपट बारी आसाराम नगर भोला इब्राहिम पटेल देशपांडे गल्ली रवींद्र भालचंद्र चौधरी भजन गल्ली अमृत गिरधर बारी देशमुख गल्ली संगिता राजेंद्र बारी बारी वाडा संगिता विजय बारी बारी वाडा प्रतिक पटेल विरार नगर योगेश देविदास बारी,बारीवाडा मयूर अरुण बारी, बारीवाडा शेख नावेद अब्दुल मजीद खिर्निपुरा यांचे विरुद्ध जिल्हाधिकारी जळगाव यांनी जारी केलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 चे उल्लंघन कलम 188 प्रमाणे तसेच मुंबई पोलीस अक्ट कलम 1951 चे कलम 37 13 प्रतिबंधक आदेशाची मुंबई पोलीस ऍक्ट 135 प्रमाणे तसेच भारतीय साथरोग नियंत्रण 1897 चे कलम 51 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांची सहकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल मुजफ्फर खान असलम खान राहुल चौधरी ही पेट्रोलिंग करीत असताना सदरची मंडळी रस्त्यावर आढळल्याने यांच्यावर 13 जुलै 20 रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात भाजीपाला विक्री त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Chaddha Classes

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *