कार्डधारकांना एकाच वेळी मिळेल दोन महिन्याचे मोफत धान्य; तहसीलदार महेश पवार

Featured जळगाव
Share This:

कार्डधारकांना एकाच वेळी मिळेल दोन महिन्याचे मोफत धान्य; तहसीलदार महेश पवार.

यावल (सुरेश पाटील): कोरोना लॉकडाऊन काळात गरजूंना मोठा दिलासा,लॉकडाऊन मुळे गोरगरिबांना हाताला काम नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी मे महिन्याच्या कोट्यातून मोफत धान्य देण्याची योजना शासनाने हाती घेतली आहे त्यामुळे सर्व बीपीएल,अंत्योदय व प्राधान्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एकाच वेळी दोन महिन्याचे मोफत धान्य दिले जाणार असल्याची माहिती यावल तहसीलदार महेश पवार पुरवठा अधिकारी भंगाळे यांनी दिली.
यावल तालुक्यात11041 अंत्योदय कार्डधारक शिधापत्रिका असून143268प्रधान योजनेतील लाभार्थ्यांची सदस्य संख्येला या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार महेश पवार यावल पुरवठा अधिकारी भंगाळे यांच्यासह पुरवठा शाखेतील सर्व कर्मचारी यांनी केले आहे योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांना देण्यासाठी पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना त्याबाबत सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मे महिन्यासाठी मोफत वितरण करावयाचे नियतन मंजूर करण्यात आले आहे,शासकीय गोदामातून अन्यधान्य पाठवले जाणार आहे धान्य वितरणामुळे गरजूंना दिलासा मिळणार आहे.
वाटप पुढील प्रमाणे होईल एका पात्र लाभार्थ्यास नियमित अंत्योदय कुटुंब योजनेसाठी प्रति कार्ड 35 किलो धान्य मिळेल यात गहू9किलो,तांदूळ10,भरडधान्य16,किलो असेल तसेच प्राधान्य योजनेतून प्रति सदस्य गहू3किलो,तांदूळ,2किलो मिळेल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय योजना प्रति सदस्य3किलो गहू,2किलो तांदूळ, आणि प्राधान्य योजने अंतर्गत प्रति सदस्य 3किलो गहू,2किलो तांदूळ वाटप केले जाणार आहे.
धान्य वाटपात भ्रष्टाचार होऊ नये म्हणून समिती गठीत- मोफत धान्य गरीब कुटुंबांना वितरित करताना त्यात भ्रष्टाचार होऊ नये म्हणून पुरवठा विभागाकडून शहर व ग्रामीण भागात समिती गठीत करण्यात आली आहे यातील नेमणूक करण्यात आलेले शासकीय कर्मचारी रेशन दुकानावर उपस्थित राहतील व त्याचे समोर मोफत धान्य गरीब कुटुंबांना वाटप करण्यात येणार आहे असे सुद्धा माहिती यावल तहसीलदार यांनी दिली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *